Life Style Diwali Tips : दिवाळीसाठी झाडू खरेदी करत आहात? 'या' गोष्टी लक्षात घ्या... | पुढारी

Life Style Diwali Tips : दिवाळीसाठी झाडू खरेदी करत आहात? 'या' गोष्टी लक्षात घ्या...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style Diwali Tips : भारतीय लोक त्यांच्या सण आणि परंपरा जपण्यात मोठा विश्वास ठेवतात. भारतीयांच्या Life Style चा हा एक भाग आहे. दिवाळीत झाडू खरेदी करून तिचे पूजन करणे ही एक मोठी परंपरा आणि संस्कृती आहे. दिवाळी जवळ आली. घरा-घरात साफ-सफाई सुरू झाली. दिवाळीच्या परंपरेत आणि संस्कृतीत जी झाडू साफ-सफाई करून लक्ष्मी घरात आणते तिच्या प्रति कृतज्ञता दर्शवण्यासाठी झाडूचे देखिल पूजन केले जाते. अनेक ठिकाणी झाडूला ‘लक्ष्मी’ देखिल म्हणतात. कारण नकारात्मकता पसारणारी सर्व घाण बाजूला सारते. तसेच स्वच्छता आणते. त्यामुळे रोगराई नष्ट होऊन समृद्धी येते. तिच्या प्रति भावना व्यक्त करण्यासाठी दिवाळीला लक्ष्मी पूजनासह झाडूची देखिल पूजा केली जाते.

इतकेच नाही आता पर्यंतची जुनी माणसे जेव्हा झाडू खरेदी करायचे तेव्हा हळद-कुंकू लावून आधी तिची पूजा करत असत. मगच तिचा वापर करण्यासाठी सुरुवात करायचे. हा त्यांच्या Life Style चा एक भाग होता. जो अजूनही ग्रामीण भागात जपला जातो.

Life Style : तुम्हाला खूप जास्त विचार करायची सवय आहे का? मग ‘या’ गोष्टी करून पाहा…

Life Style Diwali Tips : दिवाळीसाठी झाडू खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पारंपारिक पद्धतीचे झाडू घ्यावे

काळानुसार झाडूचे देखिल स्वरुप बदलत आहे. मात्र, पूजेसाठी खास पारंपारिक पद्धतीचा साळीचा झाडू आणणे हेच योग्य आहे.
झाडू जाड आणि भरलेली असावी

झाडू एकदम जाड आणि भरलेली असावी. अशी मान्यता आहे की झाडू जितकी जाड आणि भरलेली असेल तेवढी सधनता जास्त असते. त्यामुळे झाडू खरेदी करताना झाडू चांगली भरलेली आहे का नाही हे ही पाहणे महत्वाचे आहे.

Life Style Diwali Tips : झाडूमध्ये कोणताही फॉल्ट नसावा

शक्यतो तुटलेल्या सिंकचा झाडू नसावा. झाडू खरेदी करताना हे लक्षात असू द्या की त्यामध्ये कोणताही फॉल्ट नसावा. अर्थात झाडूच्या काड्या या ढिल्या झालेल्या नसाव्या किंवा त्याचा दांडा तुटलेला नसावा. अन्यथा घरात समृद्धी ऐवजी दरिद्रता येण्याची शक्यता असते.

प्लास्टिकचा झाडू पूजेसाठी वर्ज्य

प्लास्टिकची झाडू खरेदी करू नये. आपल्या आजच्या बदललेल्या Life Style मध्ये आपण आधुनिकतेचा स्वीकार केला आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या झाडूंचा अंतर्भाव आहे. मात्र, पूजन करण्यासाठी प्लास्टिकचा झाडू वर्ज्य ठरवण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीसारखा पारंपारिक झाडूच वापरावा, असे जुन्या जाणत्या ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

Life Style Diwali Tips : झाडू खरेदी करताना मोलभाव करू नका

झाडू खरेदी करताना चुकूनही मोलभाव करू नये. आपल्याला अनेकदा दुकानात पूजेचे सामान किंवा अन्य कोणतीही गोष्ट खरेदी करताना मोलभाव करण्याची सवय असते. मात्र, झाडूचे मोलभाव चुकूनही करू नये कारण तुम्ही त्याला लक्ष्मी म्हणता. परिणामी ज्या किंमतीत झाडू मिळेल. त्या किंमतीत घ्यावा. अगदीच पटत नसेल तर मौन राहून पुढचे दुकान गाठावे. मात्र, दुकानदाराकडे झाडूसाठी घासाघीस करून मोलभाव करू नये.

हे ही वाचा :

Life Style : जीन्स कोठून आली?

Life Style : आळस कसा दूर करावा? जाणून घ्या ‘या’ अगदी सोप्या पद्धती

Back to top button