Life Style : तुम्हाला खूप जास्त विचार करायची सवय आहे का? मग ‘या’ गोष्टी करून पाहा…

Life Style : तुम्हाला खूप जास्त विचार करायची सवय आहे का? मग ‘या’ गोष्टी करून पाहा…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : तसे पाहिले तर विचारांशिवाय माणसाच्या आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. असे म्हणतात की माणूस झोपेत देखिल विचार करत असतो. विचारांचा संबंध थेट मेंदू आणि मनाशी असतो. किंबहूना वैचारिक बैठक असल्यानेच माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. अनेक अध्यात्मिक गुरू तर म्हणतात की तुमचे विचारच तुमचे जीवनात काय घडेल हे ठरवतात. द सिक्रेट हे पूस्तक देखिल मानवी विचार प्रक्रियेबाबतच सांगतो. तुम्ही जो विचार करता ते तुमच्या आयुष्यात परतते. म्हणूनच आपण नेहमी चांगल्या दिशेने विचार करायला हवा असे संत-महात्मा सांगतात.

विचार हे अनेक प्रकारचे असतात. त्यात सकारात्मक-नकारात्मक, किंवा एकच विचार वारंवार येणे, असे अनेक प्रकार आहेत. एका संशोधनानुसार माणसाला 24 तासात 70 हजारपेक्षा जास्त विचार येतात. हे सामान्य विचार करणा-यांसाठी. मात्र बदलती जीवन शैली Life Style मुळे आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. वाचन करणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आणि अन्य अनेक कारणांमुळे अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय जडते. अशा माणसांना एक मिनिट देखिल शांत राहता येत नाही. खूप जास्त विचार करणे हा देखिल एक प्रकारचा मानसिक आजारच आहे.

यावर उपाय म्हणून मग योगासन प्राणायाम या Life style कडे हे लोक वळतात. मात्र एवढे करूनही अनेकांची खूप जास्त विचार करण्याची सवय जात नाही. योगासन प्राणायाम यांच्यामुळे थोडावेळ साठी विचारांची गती कमी होते. मात्र, अनेक वेळा आपल्या आजकालच्या फास्ट फॉरवर्ड Life style मुळे योग-प्राणायामाच्या सवयीत देखिल सातत्य राहत नाही. परिणामी जास्त विचार करणे, अतिरिक्त विचार करणे हा आजार काही जात नाही. यावर हे साधे उपाय करून पाहा.

दर दोन तासातून 5 मिनिटे स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. घड्याळात वेळ लावून किंवा मोबाईममध्ये अलार्म लावून मोजून 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष द्या. लक्षात घ्या तुम्हाला प्राणायाम करायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आहे. डोळे मिटून तुम्हाला फक्त एवढे लक्ष द्यायचे आहे की श्वास कसा येतो आणि कसा जातो.

तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर श्वास मोजणे हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून श्वास उलटे मोजायचे आहे. म्हणजे 100, 99, 98 असे करत एक पर्यंत यायचे. किमान 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. दररोज केल्याने निश्चितच विचारांची गती कमी होईल.

तिसरा उपाय मुद्रा रहस्यात देण्यात आला आहे. मुद्रा विज्ञान तुम्हाला तुमचे विचार नियंत्रणात आणण्यासाठी खूप मदत करते. तुम्ही खूप जास्त विचार करत असाल तर तुम्ही ' ज्ञान मुद्रा' करा. ज्ञान मुद्रेचे इतर अनेक लाभ होतात. मात्र विचारांची गती कमी करण्यासाठी ध्यान धारणा करण्यासाठी या मुद्रेचा मोठा उपयोग होतो. शिवाय तुम्ही हे अगदी कधीही करू शकता. फक्त जेवणानंतर लावू नये. दररोज 48 मिनिटे दोन्ही हाताने ज्ञान मुद्रा लावल्याने निश्चितच विचारांची गती कमी होते.

Life style कशी लावावी ज्ञान मुद्रा

हाताचा अंगठा आणि अंगठ्याजवळचे पहिले बोट म्हणजे तर्जनी यांचा अग्रभाग म्हणजे सर्वात वरचा भाग दोन्ही एकमेकांना जोडून बाकी बोट सरळ ठेवावे म्हणजे ती ज्ञानमुद्रा होते. दोन्ही हातांच्या बोटाने ही मुद्रा लावून 48 मिनिटे बसा. दररोज सराव केल्याने निश्चितच विचारांची गती कमी होते. ज्ञान मुद्रा कशी लावावी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोबत जोडलेला फोटो पाहा.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news