‘एक्स’ जोडीदार स्वप्नात येतो? जाणून घ्या मनाच्या राज्यात चालते तरी काय? dreaming about your ex

‘एक्स’ जोडीदार स्वप्नात येतो? जाणून घ्या मनाच्या राज्यात चालते तरी काय? dreaming about your ex

पुढारी ऑनलाईन : तुमचा ब्रेकअप होऊन काही वर्षं होऊन गेलेली असतात. तुम्ही आता त्यातून बाहेरही पडलेला असता. अगदी तुम्ही नव्या जोडीदारसोबत सुखात असता; पण रात्री झोपेत मात्र तुमचा एक्स जोडीदारच स्वप्नात येतो. असे अनेकांच्या सोबत होते. आपण तर दिवसा कधी 'एक्स'चा विचारही करत नाही; पण स्वप्नांच्या दुनियेत एक्सच का येतो? हा प्रश्न तुम्हाला हैराण करत असेल. यावर संशोधन झालेले आहे आणि संशोधकानी याची कारणेही शोधलेली आहेत. (Dreaming About Your Ex)

स्वप्न म्हणजे काय? हे आधी समजून घेवू

यावरील एक चांगला लेख Sleep Foundation या वेबसाईटवर आहे. त्या लेखाचा हा संपादित भाग येथे देत आहोत. या आधी स्वप्न म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मानसोपचार तज्ज्ञांनी स्वप्न म्हणजे नेमकं काय याचं विविध पद्धतीने विश्लेषण केलेले आहे. ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ सिगमंड फ्रॉईड यांच्या मते स्वप्न आपल्या अंतर्मनचा दरवाजा असतात. याला Psychodynamic Theory असे म्हटले जाते. याशिवाय Neurocognitive Theory ही एक संकल्पना आहे. या मते स्वप्नांचा संबंध आपल्या स्मृतीशी असतो. झोपेत वेगवेगळ्या स्मृतींचे तोकडे जोडून स्वप्नांची निर्मिती होते. खऱ्या आयुष्यातील घटना आणि लोक स्वप्नात येतात, पण स्वप्न एखाद्या ठराविक अनुभवाशी जोडलेले असतीलच असे नाही. याशिवाय Activation-Input-Modulation (AIM) Modelने स्वप्नांची उकल वेगळ्या पद्धतीने केली आहे. आपल्या खऱ्या जीवनात जे घडते त्याचा Virtual Reality अविष्कार म्हणजे स्वप्न असे हे मॉडेल सांगते.

 एक्स अजूनही स्वप्नात का येतो? 'ही' आहेत कारणे

१) ब्रेकअप जरी झालेला असला तरी मानसिक रूपाने आपण यातून बाहेर पडलेलो नसतो किंवा मानसिकरीत्या आपल्यासाठी सर्व काही संपलेले नसते. स्वप्न म्हणजे खऱ्या आयुष्याची प्रतिकृती, असे आपण मानतो. त्यामुळे एक्स जोडिदार स्वप्नात आला तर आपल्याला आश्चर्य वाटते. एक्स जोडीदाराबद्दलची आपल्या खऱ्या जीवनातील भावना आणि रोमँटिक भावना ही वेगळी असू शकते, हा मुद्दा लक्षात घेतला तर या प्रश्नाची उकल होते.

२) जुने आघात, जुन्या जखमा सहजासहजी भरून येत नाहीत. नातेसंबंधातील आघात स्वप्नांच्या रूपात अस्तित्व दाखवत असतात.

३ ) काही कारणांमुळे जर नुकतेच 'एक्स'चे दर्शन झाले असेल तर तो किंवा ती स्वप्नात येऊ शकते. उदा. सोशल मीडियावर स्क्रोल करतान एक्स जोडीदाराचे फोटो दिसले असतील किंवा त्याबद्दल काही माहिती दृष्टीला पडली असेल तर असे होऊ शकते. अशी स्वप्न या घटनेच्या १ ते ७ दिवसानंतर येऊ शकतात.

४)  नातेसंबंधातील समस्या – रिलेशनशिपमधील विविध कंगोरे स्वप्नात प्रकट होतात. समजा तुमची जर नातेसंबंधात फसगत झाली असेल तर तुम्हाला फसवणुकीचे स्वप्न येऊ शकते. अशा प्रकारची स्वप्न ब्रेकअपनंतर दीर्घ कालावधीपर्यंत येऊ शकतात. आपल्याला एक्स सोबतचा विषय पूर्ण बंद करायचा आहे, हे यातून दिसते.

इतरही बरीच कारणं

टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात एक लेख दिला आहे. या लेखातही बरीच कारणं दिलेली आहे. आपण जर एक्स जोडिदारला मिस करत असू तर ते स्वप्नातून प्रकट होत असते असे या लेखात म्हटले आहे. एक्स जोडीदाराबद्दलचे काही गुण आताच्या जोडीदारात असले पाहिजेत, असे आपल्या मनात कुठे तरी असते, त्यातूनही एक्स स्वप्नात दर्शन देते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news