माऊंट ब्रोमो: ‘या’ देशात ७०० वर्षांपासून ‘श्री गणेशा’ची भरते जत्रा

माऊंट ब्रोमो: ‘या’ देशात ७०० वर्षांपासून ‘श्री गणेशा’ची भरते जत्रा

 पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'माऊंट ब्रोमो : असं सांगितलं जातं की, इंडोनेशिया धर्म आणि भारतातील हिंदू धर्म सारखाच आहे. तेथील देवांच्या मूर्ती, देवांचा यात्रा, धार्मिक पूजाअर्चा आणि इतर धार्मिक परंपरा बऱ्याचदा हिंदू धर्माशी मेळ खातात. इंडोनेशियामध्ये विविध देवांची मंदिरंही सारखीच आढळतात.

आपल्याकडे डोंगरावर मंदिरं असतात, तशीच मंदिरं इंडोनेशियामध्ये आहे.अशाप्रकार जागृत ज्वालामुखी असणाऱ्या डोंगराच्या (माऊंट ब्रोमो) टोकावर श्री गणेशाची मुर्ती पुजली जाते.

जिथं पुरेसा श्वास घ्यायलाही येत नाही, तिथं आसपासच्या गावातील लोक एकत्र जमून १४ दिवसांची यात्रा करतात.चला तर ही पंरपरा काय आहे आणि गणेशाची पूजा कशी केली जाते, ते जाणून घेऊ या…

इंडोनेशियामध्ये एकूण १४१ ज्वालामुखीची ठिकाणं आहेत.

त्यातील १३० ठिकाणं ही जागृत ज्वालामुखीची आहेत.

तिथं सातत्यानं ज्वालामुखीचे स्फोट होतच राहतात.

त्यातील एक म्हणजे 'माऊंट ब्रोमो'. पर्यटकांना ठराविक ठिकाणापर्यंत जाण्यास परवानगी आहे.

असं असलं तरी स्थानिक लोक या खतरनाक ज्वालामुखी असणाऱ्या डोंगराच्या टोकाशी बसविण्यात आलेल्या श्री गणेशाची पूजा करण्यासाठी जातात.

स्थानिकांकडून असं सांगितलं जातं की, इथं श्री गणेश आहे म्हणूनच ज्वालामुखीपासून गावाचं रक्षण होतं आणि गावकरी सुरक्षित राहतात.

माऊंट ब्रोमोचा स्थानिक भाषेतील अर्थ म्हणजे, ब्रह्मा असा होतो. पण, इथं गणेश मंदीर आहे.

स्थानिक लोक असं मानतात की, ७०० वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती.

ही गणेश मुर्तीच ज्वालामुखीपासून आमंच रक्षण करते.

या पर्वताच्या पूर्वला राहणाऱ्या 'टेंगरेसी' जमातीची माणसं या गणेश मुर्तीची पूजा करतात.

या गणेशाला 'पुरा लुहूर पोटेन' नावाने ओळखले जाते.

या मंदिरात विविध प्रकारच्या गणेश मुर्ती आहेत.

विशेष म्हणजे, सर्व मुर्ती ज्वालामुखीपासून तयार झालेल्या लाव्हांपासूव तयार करण्यात आलेल्या आहेत.

या माऊंट ब्रोमोच्या आसपास असणाऱ्या ३० गावांमध्ये विविध जमातीचे १ लाख लोक राहतात.

विशेष म्‍हणजे, हे लोक स्वतःला हिंदू मानतात आणि हिंदू रिती-रिवाज पाळतात.

अलिकडच्या काळात त्यांच्या हिंदू देवदेवतांमध्ये गौतम बुद्धांची भर पडली आहे.

त्रिमुर्ती (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) बरोबर भगवान बुद्धांचीदेखील पूजा केला जात आहे.

या रिती-रिवाजांना आणि परंपरांना टेंगरेसी जमातीत खूप महत्व आहे.

ते प्रत्येक वर्षा माऊंट ब्रोमोच्या पर्वतावर १४ दिवसांची श्री गणेशाची यात्रा करतात.

या पूजेला 'याज्ञा कसदा' पर्व म्हणतात.

असं सांगितलं जातं की, १३ आणि १४ शतकात या पूजेची सुरूवात झालेली आहे.

त्यामागे एक दंतकथा आहे ती अशी… तेथील राजा-राणीला कित्येक वर्ष मुलबाळ नव्हते.

त्यांनी देवाची आराधना केली आणि देवाने त्यांना १४ मुलं दिली.

त्यातील शेवटचं मूल माऊंट ब्रोमोला अर्पण करण्याची अट घातली.

सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेवटचं मूल पर्वताला अर्पण केलं.

त्यानिमित्ताने दरवर्षी या पर्वतावर १४ दिवसांची यात्रा भरवली जाते.

इतकंच नाही तर दरवर्षी पूजा आणि बकरीचा बळी दिला जातो.

पूजा करत असताना ज्वालामुखीच्या आतमध्ये फळं, फुलं आणि सिजनेबल भाज्या अर्पण केल्या जातात.

असं म्हणतात की, या जागृत ज्वालामुखीला फळं अर्पण केल्यामुळे त्याचा विस्फोट होण्यापासून रोखून राहतो आणि जर अर्पण केलं नाही, तर तेथील गावं नष्ट होऊन जातील, अशी दंतकथा सांगितली जाते.

टेंगरेसी जमातीचं स्वतःचं एक कॅलेंडर आहे. त्यानुसार १४ दिवसांची यात्रा भरवली जाते.

त्या उत्सवाला 'एक्सोटिका ब्रोमो फेस्टिव्हल' असं म्हणतात. या उत्सवादरम्यान मोठी जत्रा भरते.

त्यामध्ये स्थानिक लोक आपापली कलाकारी दाखवितात.

ही जत्राच विदेशी पर्यटकांनी आकर्षित करून घेत असते.

जागृत ज्वालामुखी असल्याने येथील तापमान खूप असते.

त्यामुळे एखाद्या पर्यटकाला श्वासाचा त्रास असेल किंवा इतर कोणताही शरीरिक आजार असेल तर, या उत्सवात भाग घेता येत नाही.

येथील मंदिरांमध्ये पुजारीदेखील असतात. ज्यांना 'रेसी पुजंग्गा' असं म्हंटलं जातं.

हे पुजारी मंदिराकडे लक्ष देत राहतात.

वंशपरंपरेने पुजाऱ्याचा मुलगा पुजारी होतो.

श्री गणेशाच्या जत्रेमध्ये तीन पुजारी असतात लेजेन, सेपुह, दंडन असं म्हंटलं जातं.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news