पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : विचार हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी वेडी माणसे देखिल विचार करतात. काल आपण खूप जास्त विचार करणे कसे थांबवावे याविषयी माहिती घेतली. आज Life Style मध्ये नकरात्मक विचार कसे रोखावे याविषयी जाणून घेऊ.
एका संशोधनानुसार माणूस दिवसतात किमान 70 हजार पेक्षा अधिक वेळा विचार करतो. त्यापैकी 70 टक्यांपेक्षा जास्त विचार नकारात्मक असतात. नकारात्मक विचारांमध्ये कशाचा अंतर्भाव होतो. कायमच प्रवाहाच्या विरोधात बोलणे हे नकारात्मक विचारांचे लक्षण आहे. भीतीदायक विचार तसेच संबंध नसताना आजूबाजूला घडणा-या घटनांचा संबंध स्वतःशी जोडणे. हिंसक विचार, सातत्याने अमुक एखादी गोष्ट घडूच शकत नाही, असे होऊच शकत नाही, असे सातत्याने म्हणणे. तुम्हाला प्रकर्षाने हवी असलेली वस्तू तुम्हाला मिळाल्यानंतरही त्यावर विश्वास न ठेवणे
उदा. समजा तुमची तीव्र इच्छा आहे की तुम्हाला लॉटरी लागावी आणि एखाद्या दिवशी जेव्हा तुम्हाला खरोखर लॉटरी लागते तेव्हा तुम्ही वारंवार म्हणता की मला विश्वासच बसत नाही की मला लॉटरी लागली आहे तर हा विचार देखिल नकारात्मक आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात घडलेली सकारात्मक गोष्ट देखिल नकारात्मकतेकडे वळते. म्हणजे लॉटरी लागूनही तुम्ही सतत म्हणत असाल की मला विश्वासच बसत नाही तर आलेला पैसा हा तेवढ्याच तीव्र गतीने खर्च होऊन जातो.
हिंसक-घातक किंवा चुकीचे वासनांध विचार मनात मोठ्या प्रमाणात येणे याला आजची Life Style मोठ्या प्रमाणात जबाबदार असते. उदाहरणार्थ आजकाल दृक-श्राव्य माध्यमांवर मोठ्या प्रमाणात क्राईम विषयी घडणा-या घटनांचे वार्तांकन केले जाते. किंवा मालिकांमध्ये हिंसक गोष्टी दाखवल्या जातात. अशा गोष्टी वारंवार पाहिल्याने देखिल तुमच्या मनात हिंसक-घातक-किंवा चुकीचे विचार जे नकारात्मक असतात ते मोठ्या प्रमाणात जन्म घेतात.
अशा या नकारात्मक विचारांना तुम्हाला रोखायचे असेल तर तुम्हाला आजच्या तुमच्या Life Style मध्ये थोडा फार बदल करणे आणि या खालील काही टिप्स फोलो करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त सात्विक भोजन करा
आयुर्वेद सांगते जसे तुमचे भोजन असेल तसे मन बनेल जसे मन असेल तसे विचार उत्पन्न होतील. त्यामुळे आपल्याकडे भोजनाचे तीन प्रकार केले आहे. सात्विक, राजस आणि तामस. सात्विक भोजनात जास्तीत जास्त साधारण शाकाहारी जेवणाचा समावेश असतो. तर राजस भोजनात तळलेले तसेच मिष्ठान्न पक्कवानांचा अंतर्भाव असतो. तर तामस भोजनात मांसाहाराचा समावेश होतो. सकारात्मक विचारांसाठी सात्विक भोजनाचा आहारात जास्त समावेश करणे उपयुक्त ठरते.
आनंददायी संगीत ऐकणे
मनाला आनंद देणारे हलके फुलके शांत संगीत ऐकावे यामुळे देखील मनातील नकारत्मक विचार जातात. एखादा मंत्रजप किंवा भजन गायल्यास देखिल नकारात्मक विचारांपासून बचावतो.
नको असलेल्या विचाराला डिलिट करा
रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटे डोळे बंद करून तुम्हाला नको असलेला विचाराला 'मी हा विचार कायमस्वरुपी डिलिट करत आहे' असे म्हणणे. अशा प्रकारे एक-एक करून विचार डिलिट करत चला. शेवटी एक वेळ अशी येईल की कोणताच नकारात्क विचार उरणार नाही.
नकारात्मकच्या विरुद्ध सकारात्मक विचारांची पेरणी करा
तिसरे आणि सगळ्यात सोपे म्हणजे तुमच्या मनात जो नकारात्मक विचार येत असेल किंवा जो विचार तुम्हाला सतत त्रास देत असेल त्याच्या अगदी विरुद्ध जो सकारात्मक विचार असेल तो तिथे पेरणी करा. म्हणजे नकारात्मक विचार आपोआपच नाहीसा होता. उदाहरणार्थ तुम्हाला जर सातत्याने भीती वाटत असेल की तुम्ही परीक्षेत नापास व्हाल तर त्याच्या अगदी विरुद्ध सकारात्मक विचार आहे की तुम्ही परीक्षेत अगदी चांगल्या गुणांनी पास झाला आहात आणि सर्वजण तुमचे कौतुक करत आहात. असा विचार तुम्हाला तुमच्या मनात पेरायचा आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनात नकारात्मक विचार आला की लगेच त्या विचाराच्या विरुद्ध सकारात्मक विचार करायचा म्हणजे आलेला नकारात्मक विचार नाहीसा होतो.
हे ही वाचा :