World Smile Day : स्माईल प्लिज! हसताय ना; हसलंच पाहिजे, कारण हसणं आहे ‘आरोग्यदायी’

World Smile Day
World Smile Day
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वत:कडे लक्ष देणेच विसरला आहे. हेक्टिक शेड्यूल, काम, जबाबदारीचा ताण, नाते संबंधातीत ताणतणाव यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवत चालले आहे. यामुळे सध्याचा माणूस हा कायम चिंताग्रस्त, ताणतणावाच्या ओझ्याने वाकलेला, आयुष्यात नैराश्य आलेला त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतो. पण याचा परिणाम हा आपल्या फक्त चेहऱ्यावरील आनंदावर (World Smile Day) नाही तर, शरीर आणि मनावरही होतो.

आनंद, करमणूक, उत्साह, सकारात्मकता आणि मैत्री यासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावर हास्य उमटते. नेहमी चेहऱ्यावर हास्य असणारी व्यक्ती एक आनंददायी व्यक्तिमत्व म्हणूनन पाहिले जाते. अशा व्यक्तीचा प्रभावही आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी होतो.  जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे संप्रेरक बाहेर पडतात जे आनंदासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी जबाबदार असतात, त्यामुळे आनंदाचा अनुभव येतो. ताणतणावातही हसणं हे आरोग्यदायी ठरते, चला तर पाहूयात काय आहेत हसण्याचे (World Smile Day) आरोग्यासाठी फायदे

हसण्यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि ते चिरतरुण राहण्यास मदत मिळते.

हसताना कॅलरीज बर्न होऊन लठ्ठपणा कमी होतो.

हसण्याने आपले रक्ताभिसरण व्यवस्थित राहते.

हसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवल्याने किंवा खळखळून हसल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो.

हसल्याने मनाला झालेल्या किंवा होत असलेल्या वेदना कमी होतात.

नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवल्याने तुम्ही आनंदी राहून तुमचे आयुर्मान वाढण्यास मदत होते.

हसणाऱ्या लोकांकडे आपण नैसर्गिकरित्या आकर्षित होतो. तसेच अधिक गंभीर किंवा नकारात्मक चेहऱ्यावरील भाव असणाऱ्यांना आपण नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हसणे तुम्हाला आकर्षक बनवते, त्यामुळे नेहमी हसत रहा.

हसणे तुमच्या सकारात्मकतेच्या भावनांवर प्रभाव टाकते आणि तुम्हाला नेहमी कार्यतत्पर ठेवते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळविणे शक्य होते.

 काही कारणाने तुमचा मूड गेला तर, हसण्याची शारीरिक क्रिया तुमच्या मेंदूतील मार्ग सक्रिय करते, हसण्याने तुमच्या आनंदी चेहऱ्यावरील हावभाव स्वीकारून मनाला आनंदाच्या अवस्थेत घेऊन जाते म्हणजेच हसणे तुमचा मूड वाढवते.

आनंदी, सकारात्मक मूड राखणे हा निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news