Children and breakfast : मुलांसाठी ब्रेकफास्‍ट अत्‍यंत महत्त्‍वाचा, पालकांचे दुर्लक्ष ठरु शकते नुकसानकारक | पुढारी

Children and breakfast : मुलांसाठी ब्रेकफास्‍ट अत्‍यंत महत्त्‍वाचा, पालकांचे दुर्लक्ष ठरु शकते नुकसानकारक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकवेळ तुम्‍ही दुपारचे जेवण टाळा;पण सकाळचा नास्टा ( ब्रेकफास्‍ट ) चुकवू नका, एवढा सोप्‍या शब्‍दांमध्‍ये तुम्‍हाला सकाळच्‍या ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व सांगितले जाते. आता स्‍पेनमध्‍ये झालेल्‍या एका नवीन अभ्‍यासानुसार, किशोरवयीन मुलांसाठी ब्रेकफास्‍ट फारच महत्त्‍वपूर्ण असून, याकडे दुर्लक्ष झाल्‍यास त्‍यांच्‍या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो, असा निष्‍कर्ष काढण्‍यात आला आहे. मुलं ब्रेकफास्‍ट घरी करतात की बाहेर, सकाळी ते काय खातात याची पाहणी करण्‍यात आली. यासंशोधनात पालकांबरोबर मुलांसाठी महत्त्‍वाच्‍या बाबी समोर आल्‍या आहेत. ( Children and breakfast )

Children and breakfast : संशोधनात ३ हजार ७७२ मुलांचा समावेश

स्‍पेनमधील राष्‍ट्रीय आरोग्‍य सर्वेक्षणातील माहितीचे डॉ. जोस फ्रान्सिस्को लोपेझ-गिल आणि त्‍यांच्‍या सहकार्यांनी विश्‍लेषण केले. या सर्वेक्षणात त्‍यांनी ब्रेकफास्‍टची सवय आणि त्‍याचे मुलांच्‍या मानसिक आरोग्‍यवर होणार्‍या प्रश्‍नांचा समावेश करण्‍यात आला. ही प्रश्‍नावली मुलांनी आणि पालकांनी पूर्ण केली. यामध्‍ये चार ते १४ वयोगटातील ३ हजार ७७२ मुलांचा समावेश करण्‍यात आला होता.

पौष्‍टिक ब्रेकफास्‍टचा होतो शरीराबरोबरच मनावरही परिणाम

संशोधनात लोपेझ-गिल आणि त्‍यांच्‍या टीमला आढळले की, “मुलांनी ब्रेकफास्‍ट टाळणे हे दुपारचे जेवळ टाळण्‍याइतकेच हानिकारक ठरु शकते. मुलांनी घराबाहेर केलेल्‍या ब्रेकफास्‍टपेक्षा घरामधील पौष्‍टिक ब्रेकफास्‍टचा त्‍यांच्‍या शारीरिक आणि मानसिक स्‍थितीवर लक्षणीय परिणाम होतो. हे संसोधन स्‍पेन या देशापुरते मार्यादित असला तरी हे निष्‍कर्ष इतरत्र केलेल्‍या संशोधनाशी सुसंगत आहेत. कारण काही शाळांमध्‍ये मुलांना पौष्‍टिक ब्रेकफास्‍ट दिला जातो येथील निकालही अधिक सकारात्‍मक असल्‍याचे निदर्शनास आले.”

किशोरवयीन मुलांनी केलेल्‍या पौष्‍टिक ब्रेकफास्‍टचा फायदा त्‍यांच्‍या सामाजिक आणि कौटुंबिक संवाद वाढविणारे ठरते, असे लोपेझ-गिल यांनी म्‍हटलं आहे. निरोगी जीवनशैलीसाठी ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व आहेच मात्र मानसिक आरोग्‍याच्‍या समस्‍या टाळण्‍यासाठी दुग्‍धजन्‍य पदार्थ, तृणधान्‍ये यांचा समावेश असलेला ब्रेकफास्‍ट, तसेच कमी सॅच्‍युरेटेड फॅट असलेले पदार्थांचे सेवन हे किशोरवयीन मुलांच्‍या मानसिक आरोग्‍य समस्‍या कमी करण्‍यास मदत करु शकतात. जे पालक आपल्‍या किशोरवयीन मुलांनो पौष्‍टिक नास्‍टा देतात त्‍यांचे मानसिक आरोग्‍य चांगले राहते, असेही निरीक्षण या संशोधनात नोंदविण्‍यात आले आहे.

. “आमचे निष्कर्ष निरोगी जीवनशैलीचा एक भाग म्हणून केवळ न्याहारीच नव्हे तर ते घरीच ब्रेकफास्‍ट केला जावा, या संकल्‍पनेला बळकटी देणार आहेत. तसेच, मनोसामाजिक आरोग्य समस्या टाळण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थ किंवा तृणधान्ये यांचा समावेश असलेला ब्रेकफास्‍ट आणि काही कमी सॅच्युरेटेड फॅट असलेले अन्नपदार्थ किशोरवयीन मुलांच्‍या मानसिक आरोग्य समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.”, असेही लोपेझ-गिल यांनी आपल्‍या संशोधनात नमूद केले आहे. त्‍यामुळे पालकांनी मुलांना घरीच पाैष्‍टीक ब्रेकफास्‍ट देवून शारीरिक आणि मानसिक आराेग्‍य निराेगी ठेवण्‍याचा प्रयत्‍न करावा, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button