Life Style : सुटलेल्या पोटासाठी पाणी आहे जबाबदार? जाणून घ्या कारण…

Life Style : सुटलेल्या पोटासाठी पाणी आहे जबाबदार? जाणून घ्या कारण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : सोशल मीडिया तसेच तंत्रज्ञान क्रांतीमुळे बदललेली Life Style यामुळे आजची पिढी ही आरोग्याबाबत अधिकाधिक जागरुक होत आहे. पण त्याचबरोबर आजच्या काळात बदलेल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे वजन वाढणे, पोट सुटणे, चरबी चढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी एकीकडे आरोग्याबाबत अधिकाधिक जागरुकता दिसून येते पण त्याच वेळी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींकडे दूर्लक्ष झाल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुम्हाला माहिती आहे पोट सुटणे किंवा लटकण्यासाठी पाणी हा घटक मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. वाचून आश्चर्य वाटले का? हो पण हे खरे आहे. याला कारण पाणी पिण्याच्या आपल्या चुकीच्या सवयी… आज कालच्या Life Style  मध्ये आपण अनेक जाहिरातींमध्ये विविध सेलिब्रिटी उभे राहून पाणी पिताना दाखवतात. किंवा उभे राहून सॉफ्ट ड्रिंक घेताना दाखवतात. तर काही जणांना झोपण्यापूर्वी पाणी पिऊन झोपावे असा गैरसमज झालेला असतो. तर इथे आपण पाणी पिण्याच्या नियमांबाबत योगशास्त्र काय सांगते हे जाणून घेऊ…

योगशास्त्रानुसार Life Style पाणी पिण्याचे काही महत्वाचे नियम आहेत ते खालील प्रमाणे…

1. सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराच्या गरजेनुसार कोमट पाणी गाळून प्यावे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पाणी पिता तेव्हा शक्यतो त्यात काहीही न टाकणे हे उत्तम. शक्यतो मलमूत्र विसर्जनानंतर म्हणजे लघवीला किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे. मात्र, ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे. त्यांनी शौचाच्या आधी पाणी प्यावे जेणेकरून त्यांचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

2. Life Style दुसरा पाणी पिण्याचा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे जेवणाच्या 40 मिनिटे आधी आणि 40 मिनिटे नंतर पाणी पिऊ नये. वाग्भट संहितेत, वाग्भट म्हणतात, भोजनांते पाणी विषसमान. याचे आपण शास्त्रीय कारण जाणून घेऊ. आपल्या शरीरात जेवण पचवण्यासाठी आपल्या जठरामध्ये अग्नि पेटलेला असतो. हा अग्निच अन्नाचे पाचन करतो. अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी जठराग्नि जेवणानंतर किमान एक तास पेटत राहणे आवश्यक असते. मात्र, जेवणानंतर लगेचच पाणी पिल्याने हा जठराग्नि विझतो. याचा परिणाम अन्न व्यवस्थित पचत नाही. अनेकांना जेवणानंतर खूप जास्त पाणी पिण्याची सवय असते. परिणामी न पचलेले अन्न सडते. त्याचा परिणाम शरीरात गॅस होणे, पोट फुगणे, पोट सुटणे या गोष्टींवर दिसून येतो. त्यामुळे जर तुम्हाला सपाट पोट हवे असेल तर जेवणानंतर कमीत कमी 40 मिनिटे जास्त पाणी पिऊ नका. केवळ घसा कोरडा पडू नये म्हणून फक्त एक फूलपात्र एवढे पाणी प्यावे. नंतर तासाभराने आवश्यकतेनुसार पाणी प्या.

3. पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ हा कधीही उभा राहून पिऊ नये. याचे अतिशय वाईट परिणाम पोटावर होतात. योगशास्त्रानुसार उभे राहून पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पिल्याने पोटाचे नाल फुगतात. मात्र, आजच्या Life Style मुळे किंवा अनेकदा काही कारणांमुळे आपण उभे राहून पाणी पितो. मात्र, वारंवार असे केल्याने पोट फुगी किंवा फॅटी लिव्हर होऊ शकते. त्यामुळे आपले पोट सुटलेले दिसते. हे जर टाळायचे असेल तर पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ अगदी चहा-कॉफी सुद्धा बसून प्यावे.

4. Life Style रात्री झोपण्यापूर्वी पोट गच्च भरून पाणी पिऊ नये. असे योगशास्त्र सांगते. तसेच हा नियम अधिक कठोर स्वरुपात आचरणात आणायचा झाले तर सूर्यास्तानंतर कोणताही द्रव पदार्थ पोटात घेऊच नये. मात्र, आजच्या Life Style मुळे हे शक्य नाही. परंतु किमान रात्री झोपण्यापूर्वी पोट गच्च भरून पाणी पिऊ नये, एवढा नियम जरी आपण कटाक्षाने पाळला तरी आपले पोट सुटत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news