योगनिद्रा : योगातील ‘ही’ क्रिया करा, अन् गाढ झोपेचे फायदे मिळवा

योगनिद्रा : योगातील ‘ही’ क्रिया करा, अन् गाढ झोपेचे फायदे मिळवा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  : सध्याच्या धावपळीच्या जगात कामाचे तास, जबाबदाऱ्या, सोशल मिडियाचा अतिरेकी वापर, TV-Computer स्क्रीनचा परिणाम हा आपल्या डोळयांवर होतो. यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. झोप व्यवस्थित न झाल्याने त्याचा दैनंदिन दिनचर्या बिघडते. निराेगी राहण्‍यासाठी ७ ते ८ तास झोप आवश्‍यक आहे.  योगशास्त्रमध्ये (योगनिद्रा) अशा काही क्रिया आहेत की, ज्या केल्याने शरीर शिथिल होऊन तुम्‍हाला सहा तासांच्‍या गाढ झाेपे एवढी लाभ मिळू शकतात.

काही कारणास्तव, तुमची झोप झाली नसेल, शरीराला शांत- शिथिल करण्याची गरज असेल, तर योगशास्त्रातील योगनिद्रा ही एक महत्त्‍वाची क्रिया आहे. झोपी जाणे आणि जागे राहण्याच्या मधल्या अवस्थेला  गनिद्रा म्हणतात. साधारण सर्व योगाप्रकार झाल्यानंतर ही क्रिया (योगनिद्रा)  केली जाते. योगासने केल्यानंतर शरीरात निर्माण झालेली ऊर्जा साठवूण ठेवण्याचे काम योगनिद्रेद्वारे केले जाते. योगासनासोबत ही क्रिया केल्याने, निद्रानाशाची समस्या दूर होऊन, शांत झोप लागते. जाणून घेऊया ही योगमुद्रा कशी करावी.

योगनिद्रा

  • प्रथम आपल्या आसनावर  शवासनात झोपा.
  • अंग सैल करून, आपले दोन्ही हात आपल्या शरीरापासून थोड्या अंतरावर शरीराला समांतर ठेवा.
  • डोळे बंद करून, दीर्घ श्वास घ्या आणि बाहेर सोडा.
  • योगनिद्रा करताना आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष असू द्या ( श्वासोच्छवास हा झपझप किंवा अधिक वेगात नसावा, तो दीर्घ आणि लयबद्ध असावा)
  • साधारण दोन ते तीनवेळा दीर्घ श्वास घेऊन, तो सोडा.
  • यानंतर आपल्या शरीरातील एकाएका भागाकडे आपले लक्ष केंद्रीत करा.
  • सुरूवातीला आपल्या उजव्या तळपायाकडे लक्ष केंद्रीत करा. हळूहळू उजव्या पायाचा तळवा, पाय, त्यातील नसा, रक्तप्रवाह याकडे लक्ष देत, त्या अवयवाला शिथिल करण्याचा प्रयत्न करा.
  • अशाप्रकारे शरीराच्या प्रत्येक एका एका अवयवावर लक्ष केंद्रीत करून, तो शिथिल करा.
    असे करताना, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा जागृतपणा अनुभवा.
  • शरीरातील सर्व अवयव शिथिल करून झाल्यानंतर आपल्या शरीरातील संपूर्ण थकवा नष्ट होऊन, नवीन उत्साह निर्माण झाल्याची अनुभूती करा.
  • शेवटच्या टप्प्यात आपल्या आसपासच्या परिसराशी जाणीवपूर्वक एकरूप होऊन, हळूच डाव्या कुशीवर व्हा आणि हळूहळू उठून बसा.
  • उठून बसल्यानंतर स्थिर होत, सावकाशपणे दोन्ही डोळे हळूहळू उघडा.

हे आहेत फायदे

  • शरीराला संपूर्ण विश्रांती मिळते.
  • निद्रानाश दूर होऊन, शांत झोप लागते.
  • दिवसभराच्या ताणतणावातून मुक्ती मिळते.
  • योगनिद्रेमुळे मन:शांती मिळून, आनंदप्राप्‍ती होते.
  • मनाची आणि बुद्धीचा ताकद वाढून मुलांची अभ्यास करण्याचीही क्षमता वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news