Jupiter : गुरुपालट आणि इतर ग्रहयोग तुमच्‍या राशीवर करतील असा परिणाम | पुढारी

Jupiter : गुरुपालट आणि इतर ग्रहयोग तुमच्‍या राशीवर करतील असा परिणाम

पं. अभिजित कश्चप, होरामार्तंड

१३ एप्रिल रोजी गुरु या बलाढ्य ग्रहाचे कुंभ राशीतून मीन या स्वराशीत आगमन झाले आहे. गुरु (Jupiter) हा संसार सुखाचा कारक आहे. गुरु स्वराशीत, मित्र राशीत कर्क सारख्या उच्च राशीत असताना चांगली फळे देतो. धनु, मीन या गुरुच्या स्वराशी. या राशीतील गुरु प्रसन्न असतो. मेष, मिथून, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना गुरु (Jupiter) अनुकूल असतो. मीन राशीतील गुरु मिथून, कर्क, वृश्चिक, मकर या राशींना चांगले फळे देईल. धार्मिक भावना वाढेल. गृहसौख्य, संततीसौख्य लाभेल. विवाह होण्यासाठी विवाहोच्छुकांना हा कालखंड अनुकूल आहे.

येत्या सुमारे महिन्याभरात काही चांगले शुभयोग होत आहे. त्यामुळे उत्साह आणि आनंदात भर पडेल. 27 एप्रिलला शुक्र आणि नेपच्यून युती होत आहे. ही युती शुभ फलदायी आहे. आर्थिक लाभ होऊ शकतील. वृषभ, सिंह, कर्क, वृश्चिक, धनु, मकर या राशींना आर्थिक लाभाचा अनुभव येऊ शकेल.

30 एप्रिलला गुरु शुक्र युती होत आहे. गुरु स्वगृही आहे तर शुक्र उच्च राशीत आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडतील. नवी खरेदी होईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरायला अनुकूलता प्राप्त होईल.

तापमानात वाढ आणि अवकाळी पाऊस

५ मे रोजी रवी आणि हर्षल यांची मेष या अग्निराशीत युती होत आहे. या काळात तापमानाचा पारा वाढेल. 29 मे रोजी गुरु-मंगळ युती होत आहे. मीन या जल राशीत ही युती होत आहे. या योगावर वादळी/अवकाळी पावसाचे योग आहेत.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button