आता एवढंच बाकी होत ! उर्फी जावेदने बनवला चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस | पुढारी

आता एवढंच बाकी होत ! उर्फी जावेदने बनवला चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या चित्र-वित्र फॅशनमूळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री. हटके आणि  शॉर्ट कपडे हे आता उर्फीचे समीकरण बनले आहे. बऱ्याचवेळा तिच्या फॅशनसेन्स ( Urfi Javed Photodress) पाहुन चाहते म्हणतात ‘ हद कर दी आपने…

 Urfi Javed
Urfi Javed

 Urfi Javed Photodress : फोटोंचाच ड्रेस

उर्फी जावेद (Urfi Javedविचीत्र फॅशनमूळे नेटकऱ्यांकडुन ती बऱ्याचवेळा  ट्रोल (Troll) झाली आहे आणि चर्चेत आली आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पून्हा एकदा नेटकऱ्यांच्या रोषाला  बळी पडाव लागलं आहे. उर्फी आपले लेटेस्ट फोटो  आणि व्हिडिओ ( Urfi Javed Photodress) सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतचं तिने आपले काही फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाग्रानवर शेअर केले आहेत. आणि कॅप्शन द्या म्हंटले आहे. तिने यामध्ये तिने चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस घातला आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.  

 Urfi Javed Photodress : फोटोंचाच ड्रेस
Urfi Javed Photodress : फोटोंचाच ड्रेस

तिच्या या फोटो आणि व्हि़डिओवर संमिश्र कॉमेंट येत आहेत. एका युझरने सल्ला दिला आहे की,‘इसको हॉस्पिटल लेकर जाओ’, एक युझर्स म्हणतं आहे,  ‘ये क्या पहना हैं तुम्हने, कहॉं से लोग आते हैं’. उर्फी आताच ट्रोल झाली नाहीतर याअगोदरही ती ट्रोल झाली आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ करत ती चाहत्यांशी संपर्कात असते.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Back to top button