मृत्यू : व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीचे संकेत कसे ओळखावेत? धार्मिक ग्रंथ काय सांगतात? 

व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीचे संकेत कसे ओळखावेत? धार्मिक ग्रंथ काय सांगतात?
व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीचे संकेत कसे ओळखावेत? धार्मिक ग्रंथ काय सांगतात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : माणसाच्या जन्माचे संकेत ९ महिन्यांपूर्वीच मिळतात, अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचे संकेतही ९ महिन्यांपूर्वीच समजलेले असतात. मृत्यूपूर्वी काही घटना घडतात, त्यातून हे संकेत मिळत असतात. या घटना सूक्ष्म असतात, त्याकडे आपण दूर्लक्ष करतो. पण, मृत्यू अगदी जवळ आला की, लक्षात येतं की वेळ निघून गेलेली आहे.

"अजून खूप कामं राहून गेली आहेत", असं वाटायला लागतं. हे संकेत मिळाले की, मन अस्वस्थ होत राहतं. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मृत्यूवेळी मन शांत आणि इच्छामुक्त असेल, तर कोणत्याही त्रासाविना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करतं. अशा माणसाला मोक्ष प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या शरीरात सात चक्र असतात. सहस्रार : शीर्ष चक्र, आज्ञा : ललाट चक्र, विशुद्ध : कंठ चक्र, अनाहत : ह्रदय चक्र, मणिपूर : सौर स्नायुजाल चक्र, स्वाधिष्ठान : त्रिक चक्र, मूलाधार : आधार चक्र, अशी चक्रं असतात. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, तेव्हा सातपैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो. तर माणसांच्या मृत्यूपूर्वी मरणाचे कोणते संकेत मिळतात, ते जाऊन घेऊ या…

नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते

धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला की, मृत्यूवेळी सर्वांत पहिल्यांदा नाभी चक्रात वेग येतो. नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटतं. नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते. कारण, येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते. येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो. त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीचक्रात जाणवतो.

हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही. त्याला खूप वेळ लागतो. जसजसा नाभीचक्र तुटत जातो, तसतसा मृत्यू जवळ येत राहतो. तसं पाहिलं तर, मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात, याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केलेले आहेत. त्यामध्ये गरुड पुराण, सूर्य अरुण संवाद, समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता, या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने याबद्दल उल्लेख दिसतो.

नाक दिसणं बंद होतं

या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की, मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात. त्यातून समजतं की, शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे. या ग्रंथांमध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असा सांगितला आहे की, मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं बंद होतं.

हस्तरेषा धूसर होतात

असंही सांगितलं जातं की, हस्तरेषांवरही माणसाच्या श्वासाची माहिती असते. त्यातूनही व्यक्ती किती दिवस जगणार आहे, हे कळतं. समुद्रशास्त्र असं सांगतं की, जेव्हा मृत्यू जवळ येतो, तेव्हा हस्तरेषा अस्पष्ट होऊ लागतात आणि धूसर दिसायला लागतात. काही वेळात दिसायच्या बंद होतात.

पूर्वजांचा आसपास भास व्हायला लागतो

ज्योतिष शास्त्री असं सांगतात की, ज्याप्रमाणे घरात एखाद्या बाळाचा जन्म होणार असतो, त्यावेळी आपण सगळे आनंदी असतो. त्याचप्रमाणे एखादा व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होणार असतो तेव्हा परलोकात संबंधित व्यक्तीचे पूर्वज आनंदी असतात. कारण, त्यांच्या घरात एका व्यक्ती आगमण होणार असतं.

त्यामुळेच मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्याच्या आजुबाजूला पूर्वजांच्या प्रतिमा दिसत असल्याचा भास होत असतो. यामध्ये त्या व्यक्तीला त्याचे पूर्वज आणि अनेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती दिसू लागतात. कधी-कधी या प्रतिमा इतक्या गडद असतात की, त्या व्यक्तीला भीती वाटते.

अशूभ आणि भीतीदायक स्वप्नं पडतात

सूर्य अरुण संवाद किंवा स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलं आहे की, मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला स्वप्नही अशूभ येऊ लागतात. व्यक्तीला स्वप्नात तो स्वतः गावढावर बसून प्रवास करताना दिसतो. स्वप्नात पूर्वज किंवा मृत व्यक्ती दिसतात, त्यावेळी मृत्यू अगदी जवळ आलेला आहे, असं समजलं जातं. स्वप्नात स्वतःच शीर नसलेलं धड पहायला मिळणं, मृत्यू खूपच जवळ आल्याचा संकेत मानला जातो.

माणसाची सावली नाहीशी होते

माणूस जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत त्याच्यासोबत त्याची सावली असते. समुद्रशास्त्राच्या आधारानुसार असं सांगितलं जातं की, माणसाचा आत्मा ज्यावेळी शरीराला सोडून जाण्याच्या तयार असतो, त्यावेळी पहिल्यांदा त्याची सावली नाहीशी होते. याचा अर्थ असा नाही की, माणसाची सावली दिसत नाही. पण, ती सावली पाहण्याची दृष्टी व्यक्तीची नाहीशी होते.

गरूड पुराण असं सांगतं की, मृत्यू माणसाच्या अगदी जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला शेजारी बसलेला माणूसही दिसत नाही. त्या व्यक्ती यमदूत दिसू लागतात. त्यांना पाहून व्यक्ती घाबरतो.

२४ तास अखंडपणे चालणार माणसाचा श्वास हाच माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरवतो. पण, माणसाच्या श्वासावर त्याचाच अधिकार नसतो. गरुड पुरणा असं सांगतं की, जोपर्यंत माणूस जीवंत आहे तोपर्यंत माणसाचा श्वास सरळ सुरू असतो. पण, मृत्यू जवळ आला की तोच श्वास उलट्या दिशेने होतो.

पहा व्हिडीओ : या गूढ आजारांनी घेतले कोट्यवधींचे बळी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news