पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २७९ कोंटीचे बजेट फेटाळले | पुढारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २७९ कोंटीचे बजेट फेटाळले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आर्थिक बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळला. २२ सदस्यांनी बजेटच्या विरोधात मतदान केले. तर १४ सदस्यांनी समर्थनार्थ आणि उर्वरित तीन जण तटस्थ राहिले. एकंदरीत सोलापूर विद्यापीठाचा २०२२-२०२३ चा बजेट बहुमताने फेटाळण्यात आला आहे. हे बजेट बुधवारी राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सोलापूर विद्यापीठाचे यंदाचे २०२२- २३ सालाचे आर्थिक बजेट सभा मंगळवार विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वित्त व लेखाधिकारी सी. ए. शहा यांनी विद्यापीठाचे यंदाचे २७९ कोटीचे बजेट सादर केले. बजेट सादर केल्यानंतर सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, हणुमंत आवताडे, सचिन गायकवाड, प्राचार्य रोंगे, प्रा. सुशील शिंदे यांच्यासह विविध सिनेट सदस्यांनी बजेटला विरोध करण्यास सुरूवात केली. तसेच बजेटच्या चुका समोर आणल्या.

मागील वर्षाच्या बजेटमध्ये तुटीची माहिती देण्यात आली नाही आणि यंदाच्या बजेटमध्ये अनेकांच्या सहृया नसल्यामुळे यंदाचा बजेट नाकारण्यात आला असल्याचे सिनेट सदस्य हणुमंत आवताडे यांनी सांगितले. तर बजेटमध्ये क्रीडा विभागात ४४ लाख ऐवजी २ कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचे बजेट नसल्याने नाकारले असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, बहुमताने बजेट फेटाळल्यामुळे बजेट मंजूर करण्यासाठी कुलपती कार्यालयास पाठवण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या सांगण्यात आले.

राजकारण आणून केवळ विरोधात मत नोंदविले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाचा आर्थिक बजेट सादर केला होता. हा बजेट विद्यार्थ्यांचा हिताचा होता. मात्र, याला सिनेट सदस्यांनी विरोध केला. २२ जणांनी विरोधात मतदान केले. तर १४ जणांनी मंजूरीसाठी आणि ३ जण तटस्थ राहिले. काही सदस्यांनी यात राजकारण आणून केवळ विरोधात मत नोंदविले. उद्या विद्यापीठाचे कुलपती, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.
-डॉ. सुरेश पवार ( प्रभारी कुलसचिव )

यंदाच्या बजेटमध्ये सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही तरतुद केली नाही. त्याचबरोबर तुटीचे स्पष्टीकरण तसेच अनेक कारणांमुळे हा बजेट बहुमताने फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी बजेटसाठी मंजूरीसाठी विनंती केली. मात्र, सिनेट सदस्यांनी बहुमताने बजेट नाकारला.
-राजाभाऊ सरवदे ( सिनेट सदस्य)

हेही वाचलंत का? 

Back to top button