पुणे : पुढारी वृत्तसेवा
जर तुम्ही पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काळजीत आहात आणि नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करताय तर ही माहिती तुम्ही नक्की वाचा. भारतामध्ये स्वस्त आणि चांगल्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. देशात इंधनाचे दर वाढत असल्याने लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त वळत आहेत. जर तुम्हालाही इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.
देशातील सर्वात स्वस्त कारच्या यादीत टाटा टिगोर ही कार पहिल्या क्रमांकावर आहे. एकदा चार्जिंग केल्यावर तुम्ही ही कार 306 किलोमीटरपर्यंत चालवू शकता असा कंपनीचा दावा आहे. या कारची किंमत 11.99 लाख आहे. ही कार कंपनीच्या Ziptron EV तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलीय. ही कार ईव्ही डीसी या फास्ट चार्जरने अवघ्या 65 मिनिटांत चार्ज होते.
Tata Nexon EV ला कंपनीच्या Ziptron तंत्रज्ञानाद्वारे हाय-व्होल्टेज पॉवरट्रेन मिळते. या कारमध्ये डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. पॉवरच्या बाबतीत, त्याचे इंजिन 129 PS पॉवर आणि 245 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Nexon EV 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. ही कार एका चार्जमध्ये 312 किमीची रेंज देते. मार्केटमध्ये या कारची किंमत 13.99 लाख आहे.
महिंद्रा ई-वेरिटो
Mahindra e-Verito ही महिंद्रा आणि महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक कार आहे जी सध्या विक्रीसाठी आहे. ही कार एका चार्जवर 181 किमी (MIDC ने दावा केल्याप्रमाणे) ची रेंज देते. यामध्ये कंपनीने 288Ah बॅटरी पॅक वापरला आहे. जे नियमित चार्जरच्या मदतीने 11 तास 35 मिनिटांत चार्ज करता येते, तर डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तास 30 मिनिटांत चार्ज करता येते. या कारची किंमत 10. 15 लाख एवढी आहे.