छोट्या-छोट्या गोष्‍टींवरून पत्‍नीच्या रूसण्याने वैतागलाय; तर 'या' चार मार्गांनी समस्या सोडवा | पुढारी

छोट्या-छोट्या गोष्‍टींवरून पत्‍नीच्या रूसण्याने वैतागलाय; तर 'या' चार मार्गांनी समस्या सोडवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

बर्‍याचवेळा छोट्या-छोट्या गोष्‍टींवरून महिला नाराज होतात. रूसून बसतात. काही वेळा तर इमोशनल होण्यामुळे त्‍यांना रडू देखील कोसळते. मात्र पुरूषांच्या तुलनेत महिलांना मनवणे थोडे सोपे असते. जर तुमच्या पत्‍नी सोबत तुम्‍हाला या गोष्‍टींचा सामना करावा लागत असेल तर, तुम्‍हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचे तुमच्या पत्‍नीशी भावनात्‍मक नाते हे अधिक दृढ असायला हवे. कारण जर भावनात्‍मक प्रसंगात बऱ्याचवेळा असे पाउल पडू शकते, ज्‍यामुळे तुमचे नातेचं संपुष्‍टात येउ शकते. अशावेळी तुमची पत्‍नी नाराज असताना तीला मनवण्यासाठी तीचा रूसवा काढण्यासाठीचा मार्ग माहित असणे आवश्यक आहे…

तिच्याशी निवांतपणे बोला…

तुमची पत्नीशी कितीही भांडणे झाली तरी या काळात संभाषण पूर्णपणे संपवणे योग्य नाही. कारण यामुळे तुमच्या दोघांमधील अंतर आणखी वाढू शकते आणि तीचे तुमच्याशी असलेले नाते हळूहळू संपुष्टात येऊ शकते. पती-पत्नीमधील सततच्या संभाषणामुळे भांडणे लवकर मिटतात आणि तुमची पत्नी कोणत्याही वादाला गांभीर्याने घेणे थांबवते. ज्‍यामुळे तुमच्याशी नाते दृढ करण्याचे काम करते.
डिनर डेट प्लॅन करायला विसरू नका.

डिनर डेट प्लॅन करायला विसरू नका

नवरा-बायकोचं नातं कंटाळवाणं होण्यापासून वाचवण्यासाठी काहीतरी नवीन करत राहायला हवं, ज्यामध्ये खास सरप्राईजचा खूप उपयोग होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी काही खास प्लॅन बनवता आणि तिला स्‍पेशल वाटेल अशी जाणीव करून देता, तेव्हा ती खूप भावूक होते आणि तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेमाचा वर्षाव करू लागते. स्त्रिया लहानसहान गोष्टीत आनंदी होतात, ज्यात त्‍यांचे कौतुक आणि कदर करणे गरजेचे असते.

आत्मीयता देखील आवश्यक आहे…

फिजिकल कनेक्शनचा अर्थ फक्त सेक्सशी नाही. याचा अर्थ असा की जेव्हा ती तुमच्यावर रागावते तेव्हा तुम्‍ही छानअसं रोमँटिक वातावरण तयार करा. तुम्‍ही कोठेही आपल्‍या पत्‍नीसोबत चालत जात असाल तेंव्हा तीचा हात आपल्‍या हातात घ्‍या. टीव्ही पाहताना तीच्या खांद्यावर सहज हात ठेवणे या सर्व नॉन सेक्‍शुअल गोष्‍टी ही समोरच्या व्यक्‍तीला प्रेमाची जाणीव करून देतात. अशा गोष्‍टीतील नाविण्यामुळे ती तुमच्याशी भावनात्‍मकरीत्‍या जोडल्‍याची जाणीव करून देते.

विनोद बुध्दी असणे आवश्यक…

मुलींना हसवणारे आणि मजा-मस्‍ती करणारे पुरूष हे अधिक आवडतात. त्‍यामुळे जेंव्हा तुमची पत्‍नी तुमच्यावर कोणत्‍यातरी गोष्‍टीवरून जर रूसलेली असेल अशावेळी तुम्‍ही तुमच्या पत्‍नीला हलक्‍या फुलक्‍या विनोदी किस्‍से ऐकवून आपल्‍या विनोदबुध्दीने हसवण्याचा प्रयत्‍न करू शकता. यामुळे तीला केव्हाच बोर वाटणार नाही. इतकच काय दु:खातही तीला तुमच्या जवळ राहायला आवडेल. तुमची हसवण्याची सवय तीला तुमच्या आणखी जवळ आणायला मदत करेल. यामुळे तुमच्या पत्‍नीला याची जाणीव होईल की, तुम्‍हाला तुमच्या पत्‍नीला नेहमी आनंदी पाहायला आवडते. त्‍यामुळे ती तुम्‍हाला सोडून जाण्यासाठी केव्हा विचार देखील करणार नाही.

Back to top button