बायकोसाठी काय पण ! पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीनं काय केलं पहा | पुढारी

बायकोसाठी काय पण ! पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीनं काय केलं पहा

शिमला ; पुढारी ऑनलाईन

काही लोक आपल्‍या आयुष्‍याच्या जोडीदारावर इतके प्रेम करतात की, त्‍यांच्यासाठी चंद्र, तारे तोडण्याची स्‍वप्ने ते पाहतात. मध्य प्रदेशातील एका व्यक्‍तीने आपल्‍या पत्‍नीवरच्या प्रेमापोटी ताजमहालसारखे घर बांधून ते भेट दिले होते. सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली होती. लोकांनी त्‍यांचे कौतूकही केले होते. प्रेमाचं असच एक सुंदर प्रकरण हिमाचल प्रदेशमध्ये समोर आले आहे. हमीरपूर जिल्‍ह्यातील उपमंडल नादौन येथील एका रिटायर डॉक्‍टरने आपल्‍या पत्‍नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी कोट्यवधींची संपत्‍ती सरकारच्या नावे दान करून टाकली.

Virat Kohli : विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

जोडप्याने त्यांची मालमत्ता का दान केली?

वृत्तानुसार, (72 वर्षीय) डॉ. राजेंद्र कंवर हे आरोग्य विभागातून निवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी कृष्णा कंवर या शिक्षण विभागातून निवृत्त झाल्या होत्या, त्यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. खरे तर या दोघांना मूलबाळ नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपली सर्व मालमत्ता सरकारच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. पत्नी गेल्यानंतर डॉ.राजेंद्र यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे.

त्यांच्या घराला वृद्धाश्रम करण्यात यावे, अशी अटही त्यांनी मृत्युपत्रात ठेवल्याचे डॉ. राजेंद्र यांनी सांगितले. किंबहुना ते म्हणतात की, ज्यांना घरातून हाकलून दिले जाते आणि म्हातारपणात त्यांना ठेच खावी लागते. म्हणूनच सरकारने माझे कोट्‍यवधींचे घर त्या लोकांना राहण्यासाठी ठिकाण बनवावे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, राजेंद्र यांनी त्यांची 5 कोटींहून अधिकची संपत्ती सरकारला दिली आहे.

गाडी व इतर जमीनही मृत्युपत्रात टाकली…

ते पुढे म्हणाले की, घराव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गालगतची पाच कनाल जमीन आणि गाडीचाही मृत्यूपत्रात समावेश करण्यात आला आहे.

Back to top button