

पुढारी ऑनलाईन
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan-Shibani wedding) परफेक्ट कपल आहेत. बॉलीवूडच्या मोस्ट एडोरेबल कपल फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan-Shibani wedding) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. शिबानी दांडेकर आता अख्तर कुटुंबीयांची सून झाली आहे. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे.
जवळपास ४ वर्षे डेट केल्यानंतर फरहान-शिबानी यांनी १९ फेब्रुवारी दोघे लग्नबंधनात अडकले. हे लग्न अख्तर फॅमिलीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये पार पडले. या कपलने कुठल्याही रीतीरिवाजाने लग्न केल्याची माहिती मिळत नाहीये. या कपलने काही हटके करण्याचा निर्णय घेतला. शिबानी आणि फरहानने Vow तसेच रिंग सेरेमनी करून सात जन्मापर्यंत एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला.!
त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. वर-वधू असणाऱ्या फरहान-शिबानी एकत्र परफेक्ट कपल दिसत होते. सूटेड बूटेड लुकमध्ये फरहान हँडसम दिसत आहे. तर शिबानी रेड अँड बेज कलरच्या गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती. वेडिंग लुकमध्ये शिबानीने सुंदर रेड कलरचा ड्रेस घातला होता. लग्नात फरहान-शिबानीने डान्सदेखील केला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
फरहान-शिबानीच्या घरी याआधी प्री-वेडिंगला सुरुवात झाली होती. मेंहदी- हळदीच्या (shibani dandekar mehendi ) कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सोहळ्यासाठी फरहानने मुंबईतील बंगल्याला लायटींगसह फुलांची सजावट केलेली होती. याच दरम्यान फरहानच्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळीसह अनेक बॉलिवूड कलाकार देखील सहभागी झाले होते. यात बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अनुषा दांडेकर, रिया चक्रवर्ती आणि अमृता अरोरा पोहोचल्या होत्या. यावेळी शिबानीसह बहीण अनुषा दांडेकर खूपच उत्साहीत दिसत होते. व्हायरल झालेल्या फोटोत शबाना आजमीने मस्टर्ड रंगाचा आउटफिट तर शिबानी दांडेकरने यलो रंगाची फ्रिल साडी परिधान केली होती.
हेही वाचलं का?