most expensive city
most expensive city

expensive city : जगात न्यूयॉर्क, सिंगापूर सर्वात महागडे

Published on

वॉशिंग्टन : जगातील बड्या शहरांमधील महागाईविषयीचा (expensive city) एक वार्षिक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर तसेच सिंगापूर हे जगातील सर्वात महागडे ठरले आहेत. या दोन्ही शहरांना 175 शहरांच्या रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळाले आहे. 'द इकॉनामिस्ट इंटेलिजन्स युनिट'ने हा इंडेक्स जारी केला आहे. त्यामध्ये अनेक मापदंडांच्या सहाय्याने हे पडताळून पाहिले की जगातील बड्या शहरांमध्ये कशाप्रकारे महागाई वाढली किंवा घटली आहे.

अर्थतज्ज्ञांच्या 'इंटेलिजन्स युनिट'ने ही महागड्या शहरांची यादी तयार केली आहे. विशेष म्हणजे त्यामधील अंतिम दहा शहरांमध्ये भारतातील तीन शहरांची नावे आहेत. (expensive city) अनेक कारणांमुळे तेथील महागाई कमी असल्याने ती या यादीत शेवटी समाविष्ट केलेली आहेत. या तीन शहरांमध्ये गुजरातमधील अहमदाबाद, तामिळनाडूतील चेन्नई आणि कर्नाटकातील बंगळूर या शहरांचा समावेश आहे. चेन्नई 164, अहमदाबाद 165 आणि बंगळूर 161 व्या स्थानावर आहे.

सर्वात शेवटी सीरियातील दमास्कस आणि लिबियातील त्रिपोली शहर आहे. यादीत पहिल्या दहा स्थानांवर (expensive city) सिंगापूर व न्यूयॉर्क, तेल अवीव, हाँगकाँग, लॉस एंजिल्स, ज्यूरिख, जिनिव्हा, सॅन फ्रन्सिस्को, पॅरिस, कोपेनहेगन आणि सिडनी यांचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व जगालाच महागाईचा फटका बसत असल्याचे निरीक्षण या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आले आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news