कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा: अजित पवार

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा: अजित पवार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. राज्य कबड्डी असोसिएशनसह सर्वांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या पुरुष संघाची कामगिरी उंचावली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीची सभा तसेच कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात करण्यात आले होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत, त्यासाठी कबड्डीच्या प्रशिक्षकांना दर्जेदार आणि अद्ययावत प्रशिक्षण द्यावे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच कबड्डी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीच्या सभेत क्रीडा मार्गदर्शकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करणे, क्रीडा विषयक शासनाच्या विविध योजना खेळाडूंपर्यंत पोहोचवणे या विषयी चर्चा करण्यात आली.

तसेच कार्यकारणीच्या सभेत विविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जिल्हानिहाय राज्य संघटनेचे अभिनव उपक्रम राबविण्यासाठी धोरण निश्चिती, जिल्हा संघटनांच्या कामकाजात सूसुत्रता आणणे, राज्य संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे, विविध गटातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, खेळाडू निवड प्रक्रीयासंबंधी धोरण निश्चिती करणे, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील खेळाडूंना दर्जेदार साहित्य पुरविणे यांसह इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, उपाध्यक्ष अमरसिंह पंडीत, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, स्मिता जाधव, मनोज पाटील, जिल्हा प्रतिनिधी बाबुराव चांदेरे, नितीन बरडे, लिना करपे-कांबळे, सचिन भोसले, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. माणिक राठोड, राजेंद्र साळुंखे, प्रताप शिंदे, नितीन शिंदे, वासंती बोर्डे, गौतमी आरोसकर, डॉ. माधव शेजवळ, मनिषा काटकर, पंकज शिरसाट, गणेश शेट्टी, जे.जे. पाटील, विश्वास मोरे, कबड्डी असोसिएशनचे समन्वयक अविनाश सोलवट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news