

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा : घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत निधी लाभार्थियांना हप्त्यांच्या स्वरूपात मिळतो. हे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळत नसल्याने मनसेच्या वतीने बुधवारी (दि. 13) सिने स्टाईलने आंदोलन करण्यात आले. नगर परिषद कार्यलयावर चढुन हप्ते त्वरीत देण्याची मागणी या आंदेलन करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर बांधल्यानंतर नगर परिषदेकडून लाभार्थ्यांना निधी दिला जातो. हा निधी हप्त्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जातो.गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेअंतर्गत घरे बांधलेल्या लाभार्थ्यांना हे हप्ते मिळाले नाहीत. एका दिव्यांग असलेल्या लाभार्थियांनी आपले पूर्ण घर बांधले आहे. मात्र घर बांधून अनेक दिवस उलटून सुद्धा त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झाला नाही. यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर आणखी एका लाभार्थियाने स्वत: जवळ असलेली बैल जोडी विकुन घराचे काम पूर्ण केले, परंतु यांना देखील एकही हप्ता मिळाला नाही. यामुळे स्वत:च्या डोळयांचे ऑपरेशन करण्यासाठी या लाभार्थियाकडे पैसे नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासारख्या अनेक लाभार्थियांनी आपल्या घराचे काम पूर्ण केले आहे परंतु हप्ते मिळत नसल्याने लाभार्थियांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
रडखलेले हप्ते त्वरीत देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी नगरपरिषद कार्यालयावर चढुन आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी सचिन जैस्वाल, कार्यालयीन अधिक्षक डी. ए. गव्हाणकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मनसे उपजिल्हा प्रमुख विनोद बांगर, विठ्ठल देशमुख, भाऊराव पतंगे, अमर गाभने, सोमनाथ शिंदे, किरण चौतमाल, संतोष पतंगे, मनोज भोजे, दत्ता माहोरे, लक्षमण मापारी उपस्थित होते.
हेही वाचा