

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs ENG T20 : कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (AUS vs ENG) इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघीने 6 बाद 170 धावा करू शकला. इंग्लिश फलंदाज डेव्हिड मलान (42 चेंडूत 89) याला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (England beat Australia by 8 runs Australia vs England 2nd T20)
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत यजमान संघाच्या गोलंदाजांनी पाहुण्या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात पॅव्हेलियन पाठवले. जोस बटलरला 17 धावांवर पॅट कमिन्सने आपली शिकार बनवले, तर अॅलेक्स हेल्स 4 धावा करून मार्कस स्टॉइनिसचा बळी ठरला. बेन स्टोक्स पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो केवळ 7 धावा करू शकला. हॅरी ब्रूकही केवळ 1 धावेचे योगदान देऊ शकला. मात्र, डेव्हिड मलान एका टोकाकडून धावा करत राहिला. त्याला मोईन अलीची साथ मिळाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 52 चेंडूत 92 धावा जोडल्या आणि इंग्लंडची धावसंख्या 150 च्या जवळ नेली. मोईन 27 चेंडूत 44 धावा काढून बाद झाला. त्याचवेळी मलानने संघाकडून सर्वाधिक 82 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने तीन आणि अॅडम झाम्पाने दोन गडी बाद केले. (AUS vs ENG T20 England beat Australia by 8 runs Australia vs England 2nd T20)
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली आणि 22 धावा होईपर्यंत संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार अॅरॉन फिंच 13 आणि डेव्हिड वॉर्नर 4 धावा करून बाद झाले. ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो 8 धावा करून तंबूत परतला. मार्कस स्टॉइनिसने वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो 13 चेंडूत 22 धावाच करू शकला आणि बाद झाला. मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करत बाद होण्यापूर्वी 29 चेंडूत 45 धावा केल्या. टीम डेव्हिडने तुफानी शैलीत फलंदाजी केली. त्याने 23 चेंडूत 40 धावा फटकावल्या. मात्र 18व्या षटकात तो सॅम कुरनच्या अचूक थ्रोवर धावबाद झाला. पॅट कमिन्सने 11 चेंडूत नाबाद 18 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 10 धावा केल्या मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. इंग्लंडकडून सॅम कुरनने 25 धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले. (AUS vs ENG T20 England beat Australia by 8 runs Australia vs England 2nd T20)