

ऑकलंड (न्युझीलंड); पुढारी ऑनलाईन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 33 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. या खेळीत स्टोक्सने मोठा विक्रम मोडला आहे. तो कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा सिक्सर किंग बनला आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रँडन मॅक्युलमचा विक्रम मोडला. मॅक्युलम सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक आहे. (Eng Vs NZ 1st Test)
स्टोक्सच्या नावावर आता ९० कसोटीत १०९ षटकार आहेत. स्कॉट कुग्गेलिजनने टाकलेल्या ४९ व्या षटकातील तिसरा चेंडू मारून त्याने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. ब्रँडन मॅक्युलमने आपल्या कारकिर्दीत १०१ कसोटी सामने खेळले आणि १०७ षटकार मारले आहेत. या दोघांशिवाय, केवळ ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ खेळताना ९६ कसोटी सामन्यात १०० षटकार ठोकले आहेत.
स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यजमान न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडने पहिला डाव 325/9 वर घोषित केले. त्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला 306 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात 19 धावांची माफक आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा सर्व संघ ३७४ धावांवर आटोपला. या खेळीसह इंग्लडने न्यूझीलंडला ३९३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्युझीलंडचा संघ २३ षटकामध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात ६३ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला आता जिंकण्यासाठी ३३१ धावांची आवश्यकता आहे.
अधिक वाचा :