Elon Musk trip to India | एलन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर, कारण काय?; मस्क यांची X पोस्टवरून माहिती

Elon Musk in India
Elon Musk in India
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tesla CEO Elon Musk टेस्लाचे प्रमुख एलन मस्क सोमवारी (दि.२२) भारतात येणार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते, असे सांगितले होत. पण मस्क यांनीच त्यांचा भारत दौरा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वत: त्यांनी एक्स वरील पोस्टवरून दिली आहे.  (Elon Musk trip to India)

मस्क यांनी X वरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हे दुर्दैवी आहे की, टेस्लाबद्दलच्या माझ्या जबाबदारीमुळे मला माझा भारत दौरा पुढे ढकलावा लागला आहे, पण मी या वर्षीच भारताला भेट देण्याच्या संधीची वाट पाहत आहे, असे स्पष्ट केले आहे. मात्र, यामागची कारणे उघड झालेली नाहीत. याबाबत टेस्ला किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. (Elon Musk trip to India)

एलन मस्क रविवार २१ आणि सोमवार २२ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार होते. पण २३ एप्रिल रोजी टेस्लाच्या कमाई कॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांचा भारत दौरा लांबणीवर पडणार असल्याचे कारण आहे, असे माध्यम रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (Elon Musk trip to India)

Elon Musk trip to India: मस्क यांनी भारत दौऱ्याची केली होती पुष्टी

यापूर्वी गेल्या आठवड्यातच अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला या कारसाठी जगप्रसिद्ध असलेले एलन मस्क या महिन्याच्या अखेरीस भारत भेटीवर येणार असल्याचे म्हटले होते. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांत जगभरात मानदंड निर्माण केलेल्या टेस्ला कारचे भारतात उत्पादन आणि उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट पुरवणारी स्टार लिंक ही सेवा भारतात सुरू करण्याबद्दल मोठी घोषणा या दौऱ्यात होणे अपेक्षित आहे. यासाठी मस्क यांनी स्वत: भारत भेटीची पुष्टी केली होती. मात्र, त्यांच्या भेटीशी संबंधित तपशील गुप्त ठेवण्यात आला होता. सूत्रांनी दावा केला होता की मस्क यांचा दौरा टेस्लाच्या गुंतवणूक योजनांच्या घोषणेसह आणि देशात नवीन कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने असेल.

टेस्ला महाराष्ट्र-गुजरातमध्ये गुंतवणूक करू शकते

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्य सरकारांनी यासाठी टेस्लाला किफायतशीर जमीन देऊ केली आहे. प्रस्तावित मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, ज्यामध्ये यूएस २ अब्ज डॉलर ते ३ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज आहे, टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news