

वॉशिंग्टन : स्पेसएक्स, टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या ट्विटचीही सर्वत्र जोरदार चर्चा होत असते. अशातच नुकतेच मस्क यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचे इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. कोव्हिड लसीच्या डोसमुळे आपल्याला मरणयातना सहन कराव्या लागल्या, असे त्यांनी म्हटले आहे.
एलन मस्क यांनी कोव्हिड लसीच्या दुसर्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर करताना ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये मस्क म्हणतात, पहिला 'एम-आरएनए'चा बूस्टर डोस घेतल्यावर मला काहीही झालं नाही. मात्र, दुसर्यांदा मला त्रास झाला. मला बर्लिनला जायचं होतं, त्यावेळी अशा परिस्थितीत माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. यामुळे मला दुसरा बूस्टर डोस घ्यावा लागला.
कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस घेतल्यानंतर काही साईड इफेक्टस्चा सामना करावा लागला होता. त्यानंतर मला असे वाटले होते की, मी मरणयातनाच सोसतोय. ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. कर्मचार्यांची कपात केल्यापासून ते ट्विटवरवरील 'ब्लू टिक'बाबतच्या व्यावसायिक धोरणापर्यंत अनेक बाबतीत ते चर्चेत होते. आता ते या नव्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत.
हे ही वाचा