मोहम्मद शमी याला पत्नीला द्यावी लागणार दरमहा 1.30 लाखाची पोटगी | पुढारी

मोहम्मद शमी याला पत्नीला द्यावी लागणार दरमहा 1.30 लाखाची पोटगी

कोलकाता, वृत्तसंस्था : कोलकाता न्यायालयाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला दरमहा 1.30 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.

2018 मध्ये, हसीन जहाँने पुन्हा तिच्या प्रोफेशनमध्ये पाऊल ठेवले. ती एक मॉडेल आहे. हसीन जहाँने 10 लाखांच्या पोटगीसाठी कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये 7 लाख रुपये तिच्यासाठी वैयक्तिक पोटगी आणि 3 लाख रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च मागितला होता.

2022 पर्यंत शमीचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपये होते. अशा परिस्थितीत दरमहा 10 लाख रुपयांची पोटगी अजिबात जास्त नाही, असा दावा हसीनच्या वकिलांनी केला होता. यावर शमीचे वकील सलीम रहमान यांनी युक्तीवाद करताना हसीन ही स्वत: कमवत आहे. तिचे उत्पन्न 50 लाख रुपये आहे. ती स्वतः एक प्रोफेशनल मॉडेल आहे. अशा परिस्थितीत एवढी पोटगी होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने 1.30 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय घेतला.

Back to top button