शहीद भगतसिंग यांच्‍या जन्‍मगावी भगवंत मान घेणार मुख्‍यमंत्रीपदाची शपथ | पुढारी

शहीद भगतसिंग यांच्‍या जन्‍मगावी भगवंत मान घेणार मुख्‍यमंत्रीपदाची शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
शहीद भगतसिंग यांचे जन्‍मगाव असणार्‍या खातकर कलान या गावी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्‍याची घोषणा भगवंत मान यांनी आज केली. मला पंजाबची सेवा करायची आहे. यापुढे पंजाबमधील सर्व सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो असेल, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक यश मिळवताना दिसत आहे. ११७ पैकी तब्‍बल ९१ जागांवर आप आघाडीवर आहे. आपचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी ४५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. आता ते राजभवनाऐवजी खातकर कलान या शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव शपथ घेणार आहेत.

भगवंत मान ४५ हजार मतांनी विजयी

पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टीने निर्विवाद बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. आपचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवारी भगवंत मान हे ४५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर पंजाबचे माजी मुख्‍यमंत्री अमरिंदर सिंग हे १३ हजारांनी तर अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हे १२ हजार मतांनी पराभूत झाले आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button