Uttarakhand Live Result : माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसुद्धा हरले | पुढारी

Uttarakhand Live Result : माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसुद्धा हरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड राज्याची जनता पुढील ५ वर्षांचा सत्तेच्या कोणच्या हाती देते, हे आज दिवसभरात कळेल. उत्तराखंडात ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. या राज्यात ६५ टक्के लोकांनी मतदान केलेली आहे. एक्झिट पोलनुसार भाजपा किंवा काॅंग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या दोन्ही पक्षात जोरदार टक्कर होईल किंवा त्रिशंकू विधानसभेचा शक्यता सांगितली जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदिया निवडणुकीत पराभूत
राज्यातील अनेक नेते जनतेच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करू शकलेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. गोदियाल यांना 29,031 मते मिळाली मिळाल्या. निवडणुकीत विजयी झालेल्या डॉ. रावत यांना २९,६१८ मते मिळाली.
ऋषिकेश विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रेमचंद अग्रवाल यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला
  • ऋषिकेश विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रेमचंद अग्रवाल सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढत आहे.
डेहराडून अंतिम निकाल : भाजपने 10 पैकी नऊ जागा जिंकल्या
  • डेहराडूनमधील विधानसभेच्या 10 पैकी नऊ जागा भाजपने जिंकल्या आहेत. चरकाटा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एकमेव प्रीतम सिंह विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या राम चरण नौटियाल यांचा पराभव केला आहे.
चौबट्टाखाल आसन : सतपाल महाराज यांच्याकडून केशरसिंग नेगी पराभूत
  • भाजपचे दिग्गज नेते सतपाल महाराज यांनी पौडी जिल्ह्यातील चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. सुरुवातीपासूनच महाराज या जागेवर विजयी होतील अशी अटकळ बांधली जात होती. भाजपचे हेवीवेट नेते महाराज यांच्यासमोर नवा चेहरा मैदानात उतरवून काँग्रेसने पुन्हा चूक केली. चौबत्ताखल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सतपाल महाराज यांनी काँग्रेसचे उमेदवार केशरसिंग नेगी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
  • या जागेवर काँग्रेसने माजी उमेदवार राजपाल बिश्त यांचे तिकीट कापून पौडीचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष केशर सिंह नेगी यांना उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसचा हा निर्णय योग्य ठरू शकला नाही. या जागेवर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
विकासनगर : भाजपचे मुन्ना सिंह चौहान ५१९३ मतांनी विजयी
  • विकासनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुन्ना सिंह चौहान विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी कॅबिनेट मंत्री नवप्रभात यांचा ५१९३ मतांनी पराभव केला.
किच्छा विधानसभा मतदारसंघातून माजी कॅबिनेट मंत्री टिळक राज बेहाड यांचा विजय झाला
  • किच्छा विधानसभा मतदारसंघातून माजी कॅबिनेट मंत्री टिळक राज बेहाड विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 48836 मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार राजेश शुक्ला यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना 38649 मते मिळाली.
विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह चक्राता विधानसभा मतदारसंघातून विजयी
  • या निवडणुकीत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे उमेदवार प्रीतम सिंह विजयी झाले आहेत. त्यांची थेट लढत भाजपच्या रामचरण नौटियाल यांच्याशी होती.
शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांनी गदरपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळवला
  • शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांनी गदरपूर विधानसभेच्या निवडणुकीत चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळवला आहे. भाजपला ५२८४१ तर काँग्रेसला ५१७२१ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमधील विजय-पराजयाचे अंतर केवळ 1120 मतांचे होते. ‘आप’च्या उमेदवाराला केवळ १७६९ मते मिळाली.
विधानसभेच्या सात जागांचे निकाल जाहीर, तीन जागांच्या निकालांची प्रतीक्षा
  • रायपूर : भाजपचे उमेश शर्मा 30052 मतांनी विजयी
  • डोईवाला : भाजपचे ब्रिजभूषण गायरोला 29021 मतांनी विजयी
  • डेहराडून कॅंट: भाजपच्या सविता कपूर 20822 मतांनी विजयी
  • मसुरी : भाजपचे गणेश जोशी १५३२५ मतांनी विजयी
  • ऋषिकेश : भाजपचे प्रेमचंद अग्रवाल 19057 मतांनी विजयी
  • राजपूर रोड : भाजपचे खजन दास १११६३ मतांनी विजयी
  • सहसपूर : भाजपचे सहदेव पुंडीर ८३५५ मतांनी विजयी

अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी 

  • अनुपमा रावत यांनी हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री स्वामी यतिस्वानंद यांचा पराभव केला आहे.
सितारगंजमधून सौरभ बहुगुणा यांचा विजय
  • सितारगंज मतदारसंघातून भाजपा उमेदवार सौरभ बहुगुणा यांचा विजय झाला आहे. त्यांना ४३ हजार ९६ मते पडली असून पोस्टल व्हॅलेटमधील २५८ मते मिळाली आहे. १०, ९३८ मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. बहुगुणा यांच्या विरोधात उभे असलेले काॅंग्रेसचे नवतेड पाल सिंह यांचा पराभव झालेला आहे.
कॅबिनेट मंत्री बंशीधर भगत यांचा विजय
  • २३, ८६९ मतांनी कॅबिनेट मंत्री बंशीधर भगत यांचा विजय झालेला आहे. त्यांचा थेट लढत काॅंग्रेस उमेदवाक महेश शर्मा यांच्याही होता.
अखेर भाजपाचे मदन कौशिक यांचा जोरदार विजय
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांचा चमकदार विजय संपादित केला आहे. हरिद्वार येथून काॅंग्रेसचे उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांचा मदन कौशिक यांनी पराभव केलेला आहे.
रुद्रप्रयाग विधानसभा मतदारसंघात जोरदार टक्कर
  • रुद्रप्रयाग येथे भाजपा आणि काॅंग्रेस यांच्या जोरदार टक्कर सुरू आहे. १२ व्या फेरीनंतर भाजपाला २४६३ आणि काॅंग्रेसला १६१४ मते पडली आहेत.
भाजपा अध्यक्ष मदन कोशिक विजयाच्या दिशेने
  • भाजपाचे हरिद्वार विधानसभा जागेवरून उमदेवार मदन कौशिक यांची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू आहे. मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात कौशिक पिछाडीवर होते, पण मोजणीच्या जशा फेरी वाढल्या, तशी त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
पुरोलामध्ये भाजपा उमेदवार दुर्गेश्वर लाल यांचा विजय
  • पुरोला मतदार संघातून भाजपाचे उमदेवार दुर्गेश्वर लाल यांचा विज झाला आहे. त्यांना ५६४९ मतांनी विजय मिळला आहे. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार मालचंद यांचा पराभव केला आहे.
नानकमत्ता मतदारसंघात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार टक्कर
  • नानकमत्ता मतदारसंघात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार टक्कर होत आहे. नवव्या टप्प्यातील मतमोजणीमध्ये काॅंग्रेसचे गोपाल सिंह राणा यांनी ४२२० मते, प्रेम सिंह राणा यांना ४४७४ मते मिळाली आहेत.
भाजपाचे रामसिंह कैडा यांचा जबरदस्त विजय
  • भीमताल मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सिंह कैडा यांचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत आता राम सिंह कैडा यांचा समावेश झालेला आहे.
बागेश्वरमध्ये चंदन रामदास यांचा चौथ्यांदा विजय 
  • बागेश्वरमधून भाजपाचे उमेदवार चंदन रामदास यांच्या गळ्यात चौथ्यांदा विजयाची माळ पडली आहे. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार रंजीत दास यांचा पराभव केला.

कॅबिनेट मंत्री गणेश जोशी यांचा विजय

  • मसुरी : कॅंबिनेट मंत्री आणि भाजपाचे उमेदवार गणेश जोशी यांनी १५ हजार १८९ मतांनी विजय झालेला आहे. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार गोदावरी थापली यांचा पराभव केला.

माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचा मोहन सिंह बिस्ट यांनी १४ हजार मतांनी केला पराभव

  • उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचा पराभव झालेला आहे. भाजपाचे उमेदवार मोहन सिंह बिस्ट यांनी त्यांचा १४ हजारांनी पराभव केलेला आहे.

भगवानपूरमध्ये ममता राकेश यांची आघाडी

  • विधानसभा भगवानपूरमधून काॅंग्रेसचे उमेदवार ममता राकेश या १७ टप्प्यातील ८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्ये आनंद व्यक्त करत आहेत.
रेखा आर्य यांच्या मतांंमध्ये वाढ
  • जागेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रेखा आर्य या चौथ्या टप्प्यातील मोजणीनंतर २९४० मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री हरिश रावत १२ हजार मतांनी मागे
  • माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या मतांमधील अंतर पुन्हा वाढलं आहे. ते सुमारे १२ हजार मतांनी पिछाडीवर जाताना दिसत आहेत.
भाजपातून काॅंग्रेसमध्ये गेलेले यशपाल आर्य पिछाडीवर
  • भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काॅंग्रेसमध्ये गेलेले यशपाल आर्य भाजपाचे उमेदवार राजेश कुमार यांच्याशी जोरदार टक्कर होत आहे. ९ व्या टप्प्यात झालेल्या मतमोजणीनंतर १३०० मतांनी पिछाडीवर आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी तिसऱ्या टप्प्यात १ हजार मतांनी मागे…
  • मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी तिसऱ्या टप्प्यात १ हजार मतांनी मागे जाताना दिसत आहे. आतापर्यंत १३ टप्प्यांमध्ये मजमोजणी झालेली आहे.
कॅबिनेट मंत्री मदन कौशिक पिछाडीवर 
  • कॅबिनेट मंत्री मदन कौशिक पिछाडीवर जात आहेत. २०९ मतांनी त्यांची पिछाडी आहे. काॅंग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी त्यांच्या विरोधात उभे आहेत.
गदरपूरमध्ये अरविंद पांडे यांची आघाडी कायम…
  • गदरपूरमध्ये शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांची आघाडी कायम आहे. सहाव्या टप्प्याच्या मतमोजणीनंतर अरविंद पांडे ७३०१ मतांनी पुढे आहेत.
विकासनगर मतदारसंघात भाजपा-काॅंग्रेस जोरदार टक्कर 
  • विकासनगर मतदरासंघातील मतमोजणीच्या पाचव्या टप्प्यामध्ये भाजपा उमेदवार मुन्ना सिंह चौहान फक्त ७९ मतांनी पुढे आहेत, तर काॅंग्रेसचे उमेदवार नवप्रभात यांना आघाडी मिळताना दिसत आहे.
गंगोत्री विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी टक्कर…
  • गंगोत्री विधानसभा मतदारसंघात तिहेरी टक्कटर होते आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मोजणीनतंर भाजपाला ८८९४, काॅंग्रेसला ६७८२ आणि आम आदमी पार्टीला १४११ मते मिळाली आहेत. भाजपाला २११२ मतांपर्यंत पोहोचली आहे.
माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या मतांमध्ये मोठं अंतर
  • माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या मतांमधील अंतर वाढत आहे. लालकुआं विधानसभा मतदारसंघात मोहन बिस्ट ७०८५ मतांनी पुढे आहेत. हरिश रावत तिसऱ्या टप्प्यातील मोजणीनंतर ७६३९ आणि मोहन बिस्ट १४७२४ मते मिळाली आहेत.
उत्तरकाशी : गंगोत्री-यमुनोत्री भाजपा पुढे, तर पुरोला येथे काॅंग्रेस पुढे…
  • गंगोत्रीमध्ये भाजपा १७१ मतांनी पुढे
  • यमुनोत्रीमध्ये अपक्ष उमेदवार २३२ मतांनी पुढे
  • पुरोलामध्ये काॅंग्रेस १८३९ पुढे
भाजपाला धक्का : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ९०० मतांनी मागे आले आहेत…
डेहराडून : कोणत्या विधानसभा मतदारसंधात कोण पुढे, जाणून घ्या…
  • डेहराडून जिल्हा १० जागा
  • चकरातामध्ये काॅंग्रेस पुढे
  • विकासनगर भाजपा पुढे
  • सहसपूर काॅंग्रेस पुढे
  • धर्मपूर काॅंग्रेस पुढे
  • राजपूर भाजपा पुढे
  • राजपूर भाजपा पुढे
  • कैंट भाजपा पुढे
  • मसूरी भाजपा पुढे
  • डोईवाला भाजपा पुढे

पिथौरागड विधानसभा मतदार संघात काॅंग्रेस पुढे

  • या मतदार संघामध्ये मजमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा २६६१ तर, काॅंग्रेसला २९१९ मतं मिळाली आहे. यामध्ये काॅंग्रेस २५८ मतांनी पुढे असल्याचे दिसत आहे.

अल्मोडाच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपा पुढे

  • अल्मोडामध्ये भाजपा १७० मतांनी पुढे
  • सोमेश्वरमध्ये भाजपा ८८५ मतांनी पुढे
  • जागेश्वरमध्ये भाजपा ७२१ मतांनी पुढे
  • द्वाराहाटमध्ये भाजपा ५५० मतांनी पुढे
  • सल्टमध्ये भाजपा १७५ मतांनी पुढे
  • राणीखेतमध्ये भाजपा २५६ मतांनी पुढे…

देहराडूनमध्ये काॅंग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार टक्कर

  • डोईवाला येथे पहिल्या टप्प्यात भाजपाच्या भूशण गैरौला यांनी ४४३८ मते, तर काॅंग्रेसच्या गिन्नी यांनी २१७८ मते, अपक्षाचे जितेंद्र नेगी ४४८ मते मिळाली आहेत.
  • सहसपूरच्या दुसऱ्या टप्प्यात काॅंग्रेसच्या उमेदवारांना ४४०८ मतांनी पुढे आहे. विकासनगर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या मुन्ना सिंह चौहान यांना ३२३८ मते, तर काॅंग्रेसच्या नवप्रभात ३१५९ मते मिळाली आहेत.
  • राजपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या खजान दास यांना ३४१ मते, तर काॅंग्रेसच्या राजकुमार यांना केवळ ८२ मते मिळाली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button