Manipur Election Live Updates 2022 : भाजप ३० जागांवर आघाडीवर | पुढारी

Manipur Election Live Updates 2022 : भाजप ३० जागांवर आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. तिन्ही राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न, तर काँग्रेसचा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. (Election Live Updates 2022)

मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्चला दोन टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीचे निकाल आज येणार आहेत. मात्र त्याआधी मणिपूर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पाहिले तर भाजप ४१ टक्क्यांसह ३३-४३ जागा जिंकू शकतो. यानंतर काँग्रेस केवळ ४-८ जागांवर येऊ शकते. दुसरीकडे, एमपीएफला ४-८ जागा मिळतील आणि एनपीपी ४-८ जागा जिंकू शकेल. मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत.

मणिपूर हे भारताच्या ईशान्येकडील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेला नागालँड आणि पश्चिमेला आसामची सीमा आहे. तर मणिपूरच्या नैऋत्येला मिझोराम आहे. मणिपूरच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि जंगलांना महत्त्वाचे स्थान आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार मणिपूरची लोकसंख्या २८ लाख ५५ हजारांच्या जवळपास आहे.

मणिपूर लाईव्ह अपडेट्स – 

*निकाल अजुनही यायचं आहे. आम्हाला बहुमत मिळेल. हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाखाली असेल. माझं काम आहे राज्यासाठी काम करणं : मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह

*भाजप ३०, अपक्ष २४ आघाडींवर आहे.

*भाजप २८ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर. तर इतर २४ जागा.

*माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ओकराम इबोबी हे थौबलमध्ये भाजपचे उमेदवार लीतांथेम बसंत सिंह यांच्यापेक्षा १ हजार २२५ हून अधिक मतांनी पुढे आहेत.

*भाजपने एक जागा जिंकली, जद(यू) ने १ जागा मिळवली.

*हिंगांग मतदारसंघातून मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह २४,२६८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी. सरतचंद्र सिंह ६४८६ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातून २ उमेदवार मैदानात आहेत.

*भाजप २७ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस १० जागांवर आघाडीवर, अपक्षला २४ जागा.

*हिंगांग जागेवरून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग प्रचंड मतांनी आघाडीवर.

हिंगांग जागेवरून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग प्रचंड मतांनी आघाडीवर. मणिपूर विधानसभा निवडणुकीतील इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हिंगांग विधानसभा ही हॉट सीट आहे. येथे भाजपचे उमेदवार एन. बीरेन सिंह आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलमध्ये त्यांना २२,४९८ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार पी. सरचंद्र सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

*काँग्रेस ८ जागांवर तर भाजप २८ जागांवर आघाडीवर. अपक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे.

*भाजप २५ जागांवर आघाडीवर आहे.

* भाजप २८ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर, अपक्षला २३ जागा.

*भाजप २९ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर. अपक्ष १७ जागांवर आघाडीवर आहे.

*भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस १० जागांवर पुढे आहे. तर अपक्ष १७ जागांवर आघाडीवर आहे.

*काँग्रेस १० जागांवर आघाडीवर

*भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे.

*भारतीय जनता पक्ष हेइरोक आघाडीवर आहे

* इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी श्री गोविंदा जी मंदिरात प्रार्थना केली. त्यांच्यासोबत भाजप नेते संबित पात्राही उपस्थित होते.

*देवाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांत शांतता होती, विकास झाला, सर्वजण एकत्र राहिले. मी देवाला प्रार्थना करत आहे की, भाजपचे सरकार बहुमताने स्थापन व्हावे आणि शांतता नांदावी: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग

*मणिपूरच्या चार जागांपैकी काँग्रेस तीन आणि भाजप एका जागेवर आघाडीवर

  • मणिपूरमध्ये काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर
  • मणिपूरमध्ये ५ राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात

मणिपूर विधानसभा निवडणुक २०२२ च्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपला याठिकाणी विजयाचा आत्मविश्वास वर्तवला जात आहे. दरम्यान, काँग्रेसला अशी आशा आहे की ते आपल्या विरोधकांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखतील.

नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ), जेडी(यू) हे दोन्ही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विविध एक्झिट पोलने राज्यात भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला असून, भाजपला 23 ते 43 जागा मिळतील तर काँग्रेसला चार ते 17 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलमध्ये एनपीपीला 4-14 जागा मिळतील, तर भाजपचा सहयोगी एनपीएफला 2-8 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Back to top button