Uttar pradesh election result Live : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार ! | पुढारी

Uttar pradesh election result Live : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवपास निश्चित झाले आहे. दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील ४०३ जागापैंकी २७३ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष ११९ जागांवर आघाडीवर आहे. मायावतींचा बसप ४ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत.

ज्या उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याची, तसेच हाथरस प्रकरण झाले त्या ठिकाणी सुद्धा भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आघाडीवर आहेत, तर कथरालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.

योगी आदित्यनाथ (भाजप) गोरखपूर शहरातून तर अखिलेश यादव (एसपी) करहलमधून निवडणूक रिंगणात आहेत. कौशांबीच्या सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (भाजप) नशीब आजमावत आहेत. याशिवाय फाजील नगरमधून स्वामी प्रसाद मौर्य (एसपी), जसवंतनगरमधून शिवपाल सिंग यादव (एसपी), कुंडामधून रघुराज प्रताप सिंग उर्फ ​​राजा भैया (जनसत्ता दल लोकतांत्रिक), कानपूरच्या महाराजपूर मतदारसंघातून सतीश महाना (भाजप), कानपूरमधून अब्बास मौ अन्सारी (मुख्तार अन्सारी यांचा मुलगा- सुभाष) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Back to top button