

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : माझ्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम 25 नोव्हेंबरला चंदीगडमध्ये आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला पुण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते; पण तो कार्यक्रमच रद्द केल्याचे संयोजकांनी कळवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळेच हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. आता पवार यांच्या दबावामुळेच पुण्यातील कार्यक्रमाचे निमंत्रण रद्द केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
त्या म्हणाल्या, आयोजकांनी मला 26 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते; पण तीन-चार दिवसांनी आयोजकांनी मला फोन केला. त्यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित हे सगळे प्रकरण झालेय. त्यामुळे आता आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही, असे सांगितले. मला एकदम धक्का बसला; पण राजकीय नेत्यांबद्दल बोलल्यामुळे असे काही तरी होणार हे लक्षात आले, असे बोरवणकर म्हणाल्या.
ज्यांनी मला विमानाचे तिकीट पाठवले होते आणि माझा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आलेय. ते पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायला सांगितले. त्यावर संबंधितांनी, तुमचे सेशन ओव्हरलॅप होतेय, त्यामुळे ते रद्द करण्यात आले आहे. तुमचे विमान तिकीटही रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांना अधिकारी घाबरतात. त्याचाच हा परिणाम असेल, असे बोरवणकर म्हणाल्या.
हेही वाचा