Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जाजरकोट आणि रुकुममध्ये बचावकार्य सुरूच | पुढारी

Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जाजरकोट आणि रुकुममध्ये बचावकार्य सुरूच

पुढारी ऑनलाई डेस्क : विनाशकारी भूकंपाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये आज (दि.५) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल होती. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, भूकंप पहाटे ४:३८ वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू काठमांडूपासून १६९ किमी उत्तर-पश्चिम १० किमी खोलीवर होता. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर शनिवारी दुपारीही ३.३ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले.

Back to top button