Breakfast is important : तुम्‍ही ब्रेकफास्‍ट टाळता? जाणून घ्‍या, याचे काय होतात शरीरावर दुष्‍परिणाम

Breakfast is important : तुम्‍ही ब्रेकफास्‍ट टाळता? जाणून घ्‍या, याचे काय होतात शरीरावर दुष्‍परिणाम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकवेळ तुम्‍ही दुपारचे जेवण टाळा;पण सकाळचा नास्टा (ब्रेकफास्‍ट) चुकवू नका, एवढा सोप्‍या
शब्‍दांमध्‍ये तुम्‍हाला सकाळच्‍या ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व डॉक्‍टर आणि आहारतज्‍ज्ञ सांगत आले आहेत. मात्र अलिकडे इंटरनेटच्‍या माध्‍यमातून वजन कमी करण्‍यासाठी दोन जेवणामध्‍ये अधिक अंतर ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो. ( Breakfast is important ) तसेच अनेकजण धावपळीत (विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले) ब्रेकफास्‍टची वेळ चुकवतात. आहारतज्‍ज्ञ रुजुता दिवेकर यांनी आपल्‍या नव्‍या Instagram पोस्टमध्‍ये ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व सांगितले आहे. जाणून घेवूया याविषयी …

ब्रेकफास्‍ट चुकवल्‍याने शरीरासह मनावरही होतो परिणाम

ब्रेकफास्‍टच्‍या महत्त्‍वाबाबत डॉ रुजुता दिवेकर सांगतात, "बराच वेळ तुम्‍ही उपाशी राहिलात तर त्‍याचा परिणाम तुमच्‍या शरीरासह मनावरही होतो. शारीरिक दुष्‍परिणाम म्‍हटलं तर, बद्धकोष्ठता, केस गळणे, डोकेदुखी, मायग्रेन त्‍याचबरोबर चीडचीडही होते. तरुण मुलींमध्‍ये डायटच्‍या नावाखाली सलग काही तास उपाशी राहण्‍याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम हा मासिक पाळीवरही होतो."

Breakfast is important : ब्रेकफास्‍ट चुकविल्‍यामुणे वाढते वजन

आपल्‍या आहारातून ब्रेकफास्‍ट वगळण्‍यास वजन कमी करण्‍यास काही फायदा होतो का, असाही काहींचा प्रश्‍न असतो. मात्र आपल्‍या आहारात त्‍याचे खूप महत्त्‍व आहे. तुम्‍ही जर ब्रेकफास्‍ट टाळलात तर शरीरातील सूक्ष्‍म पोषक घटकांवरही परिणाम होतो. हिमोग्‍लोबिन, बी १२, कॅल्‍शिअम, व्‍हिटॅमिन डी कमी होण्‍याची धोका असतो. ब्रेकफास्‍ट टाळला तर वजन कमी होईल, हा समज चुकीचा आहे. यामुळे तुम्‍ही ब्रेकफास्‍ट कधीच चूकवू नका. उलट नास्‍टा चुकवल्‍याने वजन वाढण्‍याचा धोका असतो. मात्र ब्रेकफास्‍टसाठी पॅकिंग फूड टाळावे. घरात केलेले पदार्थांचा आहारात समावेश करावा, असा सल्‍लाही दिवेकर देतात.

आहारातज्‍ज्ञांच्‍या मते आपल्‍या दैनंदिन उर्जेपैकी १५ ते २५ टक्‍के ऊर्जाही ब्रेकफास्‍टमधील आहारातून मिळाली तर शरीराचे योग्‍य पोषण होते. तसचे मानसिक स्‍थितीही चांगली राहते. आता तुम्‍हाला ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व पुन्‍हा एकदा समजलं असेल. यापुढे ब्रेकफास्‍ट टाळू नका. कारण तोच आपल्‍या दिवस अधिक ऊर्जा करण्‍यास मदत करतो. तसेच दिवसभर आपला मूडही चांगला ठेवतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news