मुहूर्ताचा ट्रेड : ही काळजी घ्या, नक्की धनलाभ होईल | पुढारी

मुहूर्ताचा ट्रेड : ही काळजी घ्या, नक्की धनलाभ होईल

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी दिवशीचा मुहूर्ताच्या ट्रेड अनेकांना धनलाभ देऊन जातो. हा ट्रेड पुढच्या संपूर्ण वर्षांची दिशा ठरवतो. पुढील आर्थिक वर्षांत आर्थिक भरभराट व्हावी, संपन्नता यावी अशी या ट्रेडमागची कल्पना आहे. हा ट्रेड बाँम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही एक्सचेंजवर होतो. मुहूर्ताच्या ट्रेडसाठी खालील प्रकारे काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात. (muhurat trading)

१. मुहूर्ताचा ट्रेड हा शेअर घेण्यासाठी आणि विक्रीसाठी चांगला मानला जातो. या वेळी होणाऱ्या ट्रेडिंगचा व्हॉल्युम मोठा असतो. सर्वसाधारण मुहूर्ताचा ट्रेड हा बुलिश असतो. त्यामुळे नव्या तसेच अनुभवी अशा दोन्ही गुंतवणुकदारांना यामध्ये फायदा होतो.

२. जे लोक ग्रहदशेवर विश्वास ठेवतात, आणि अजूनही शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही, अशांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा मुहूर्त शुभ मानला जातो.

३. दीर्घ मुदतीचा विचार करून काही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही जर नव्याने गुंतवणूक करत असाल तर काळजीपूर्वक आणि नीट अभ्यास करून शेअर्स घ्या.

४. जे अनुभवी ट्रेडर आहेत, त्यांना मुहूर्ताच्या ट्रेडचा नक्की फायदा होतो. हा मुहूर्त शुभ मानला जातो त्यामुळे अनेक गुंतवणुकदार आणि व्यापारी प्रतिकात्मक म्हणून शेअर्सची खरेदी आणि विक्री करत असतात; यातून काही फायदा व्हावा हा हेतू नसतो. पण जे अनुभवी ट्रेडर आहेत, ते यातून हमखास नफा मिळवतात.

५. मुहूर्ताच्या सत्रात मार्केट अत्यंत अस्थिर असते, त्यामुळे खरेदी विक्री करताना काळजी घ्यावी.

६. जर या अस्थिरतेचा फायदा घ्यायचा असेल, तर व्हॉल्युम जास्त ठेवावे लागते.

७. एखादा शेअर मुहूर्ताच्या सत्रात चांगला चालला तर तोच शेअर नंतर चांगला चालेल याची खात्री नसते. त्यामुळे कंपनीची मूलभूत स्थिती कशी आहे, हे पाहून गुंतवणूक करावी.

हेही वाचा

Back to top button