वस्त्रोद्योगासाठी साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक : चंद्रकांत पाटील | पुढारी

वस्त्रोद्योगासाठी साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक : चंद्रकांत पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वस्त्रोद्योग विभाग आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सफ्युचर 2023 ही गुंतवणूकदारांची एकदिवसीय परिषद हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विविध वस्त्रोद्योग घटकांतील 33 कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून, या माध्यमातून 5 हजार 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण 2023-2028 घोषित केलेले आहे. केंद्र सरकारच्या ‘5 एफ’ (फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत असे धोरण तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण करणे, ती एकत्रित करणे आणि वस्त्रोद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा या धोरणाचा उद्देश आहे, असे यावेळी पाटील म्हणाले. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी उपस्थित होते.

Back to top button