डायपेगिया : अन्न गिळताना होतो त्रास, जाणून घ्या त्यांची लक्षणे आणि उपचार

डायपेगिया : अन्न गिळताना होतो त्रास, जाणून घ्या त्यांची लक्षणे आणि उपचार
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

अन्‍न खाल्ल्यानंतर ते घशातून पोटात जाते. काही वेळा मात्र त्या प्रक्रियेत घशाला वेदना होतात. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो; मात्र तो प्रामुख्याने प्रौढांमध्ये दिसून येतो.

पोटातील आम्लामुळे घशाच्या उतींना इजा होते. त्यामुळे घशाच्या आतल्या बाजूच्या भिंती आकुंचन पावतात. हा आजार तसा दुर्मीळ आहे; पण कधी कुणाला झाल्यास त्यावर काय उपचार करता येतील, याची माहिती घेऊ.

गिळण्यात येणार्‍या अडचणी म्हणजेच डायपेगिया. अन्‍न मग ते पेय पदार्थ असो किंवा घट्ट पदार्थ तोंडातून गिळण्यास त्रास होतो. डायपेगियामध्ये वेदनाही होऊ शकतात. काही बाबतीत घशाला सूज येण्याचीही शक्यता असते. घशाच्या खालच्या बाजूचे स्नायूंना योग्य आराम मिळाला नाही, तर ते खाल्लेले अन्‍न पोटात जाऊ देत नाहीत. त्यामुळे अन्‍न पुन्हा घशाशी येते. घशाच्या भिंतींच्या स्नायूंना अशक्‍तपणा आल्यास ही परिस्थिती काही कालावधीनंतर अजून बिकट होऊ शकते.

लक्षणे

  • सूज येण्याबरोबर वेदना होतात.
  • खालेले अन्‍न घशातच अडकले आहे किंवा छातीत किंवा स्तनांच्या हाडामागे अडकल्याची भावना निर्माण होते.
  • अतिप्रमाणात लाळेची निर्मिती
  • अन्‍न घशाशी येणे छातीत जळजळ होणे
  • पोटातील आम्ल किंवा अन्‍न पुनः पुन्हा घशाशी येणे
  • अनपेक्षित वजनात घट होणे.
  • गिळताना खोकला येणे किंवा अडकल्यासारखे वाटणे
  • गिळताना त्रास होत असल्याने पदार्थाचे छोटे छोटे तुकडे करावे लागणे किंवा काही अन्‍नपदार्थ वर्ज्य करावे लागणे.

कारणे
गिळण्यानंतर बहुतेक वेळा घशाची पोकळी
अरुंद किंवा संकुचित झाल्याने गिळताना खूप दाब घशावर पडतो.
घशाची पोकळी अरुंद झाल्याने अन्‍नाचे मोठे घास घशात अडकतात. गॅस्ट्रोफागेल रिफ्लक्ससारख्या आजारांमध्ये घशात ट्यूमर किंवा पेशींना इजा झाल्याने अन्‍नपदार्थाचे मोठे तुकडे घशात अडकू शकतात.
घशात काही वेळा अन्‍नाचे घास अडकतात. ज्या वृद्ध व्यक्‍तींना दाताच्या काही समस्या असल्याने चावताना त्रास होतो, त्यामुळे घास घशात अडकतो.

उपचार
घशाच्या सूज आलेल्या स्नायूंना मोकळे करण्यासाठी काही व्यायाम फायदेशीर आहेत. ते केल्याने अन्‍न उलटून येणे थांबू शकते.

  • गिळण्याचे तंत्र- अन्‍न गिळण्याचे तंत्रही शिकावे लागते. तोंडात कशा प्रकारे अन्‍न घालावे किंवा डोके कसे ठेवावे जेणेकरून अन्‍न गिळण्यास मदत होईल.
  • विशिष्ट पेय पदार्थ- गिळण्याच्या त्रासामुळे शरीरात अन्‍न कमी प्रमाणात गेल्याने वजन अचानक घटते. त्यामुळे अशक्‍तपणाही येतो. त्यामुळे विशेष पेय पदार्थ किंवा पातळ पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील पाणी कमी होणे टाळता येते. थोडक्यात, डिहायड्रेशन होत नाही.
  • फिडिंग ट्यूब – डायपेगियाच्या गंभीर रुग्णांसाठी फिडिंग ट्यूबचा वापर करावा लागतो. त्यामुळे गिळण्याची प्रक्रिया नीट होत नसेल, तर फिडिंग ट्यूबच्या साह्याने अन्‍न दिले जाते.
  • खाण्याच्या सवयीत बदल- कमी प्रमाणात खावे. थोड्या थोड्या वेळाने थोडे खावे. अन्‍नपदार्थांचे लहान लहान तुकडे करावेत. खाताना हळूहळू खावे.
  • हे पदार्थ टाळा- मद्यपान, तंबाखू, कॅफीनयुक्‍त पदार्थ टाळावेत अन्यथा छातीत जळजळ होण्याचे प्रमाण वाढते.
    हळू खाणे आणि चावून खाणे- अन्‍न खाताना चावून चावून हळू खावे. त्यामुळे पचन होणे सोपे जाते.

डायपेगिया अर्थात गिळताना होणार्‍या वेदनेचे निदान लवकर झाले, तर गंभीर स्वरूप टाळणे शक्य आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news