

डॉ. मनोज शिंगाडे नसेसंदर्भात सीव्हीआय ही गंभीर समस्या आहे. ही समस्या असल्यास चालताना खेचल्यासारखे किंवा खूप जास्त थकवा जाणवत असेल, तर या खुणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण, ही नसांसंबंधी गंभीर समस्या असू शकते.
वैद्यकीय भाषेत त्याला क्रोनिक व्हेन्स इनसफिशियन्सी किंवा सीव्हीआय म्हणतात. ही समस्या कोणती आणि का होते?
लक्षणे-
शरीराच्या इतर अवयवाप्रमाणे पायाला ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले शुद्ध रक्तातून तो मिळतो. पायांना ऑक्सिजन दिल्यानंतर अशुद्ध रक्त नसांमधून परत पायातून वर फुफ्फुसातून वर शुद्धीकरण करण्यासाठी जातो. कोणत्याही कारणाने ही प्रणाली मंदावली तर पायाची ड्रेनेज सिस्टिम खराब होते. त्याचा परिणाम असा की, ऑक्सिजनविरहीत अशुद्ध रक्त वर फुफ्फुसांकडे न जाता पायाच्या खालच्या भागात जमा होते. त्यामुळे हा विकार होतो.
स्त्रियांमध्ये जाणवते ही समस्या-
हा विकार कोणालाही होऊ शकतो; पण 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त जाणवते. अनेक स्त्रियांना गर्भावस्थेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ही लक्षणे दिसतात. सतत उभ्याने काम केल्यास, उंच टाचेचे चप्पल किंवा सतत बैठे काम केल्यामुळे आणि शारीरिक हालचाली कमी होत असल्याने महिलांना हा विकार लवकर होतो.
या गोष्टीकडे द्या लक्ष :
शरीराच्या खालच्या भागात म्हणजे पाय आणि कंबर इथे जास्त घट्ट कपडे घालू नयेत. त्याशिवाय जास्त उंच हिल्स घालू नयेत. त्यामुळे अशुद्ध रक्त प्रवाहात बाधा निर्माण होते. क्रोनिक व्हेन्स इनसफिशियन्सीने ग्रस्त महिलांनी दोरीच्या उड्या, अरोबिक्स किंवा उड्या मारण्याचे व्यायाम करू नये. अशा प्रकारचे व्यायाम नसांना फायदा करण्याऐवजी नुकसानच अधिक होते. जास्त झटका देणारे आणि पाय दुमडण्याचे व्यायाम करू नये. नियमित चालावे. रात्री झोपताना पायाखाली उशी घ्यावी. त्यामुळे पाय छातीपेक्षा दहा किंवा बारा इंच वर राहतात आणि ऑक्सिजनरहित रक्त जमा होण्याची प्रक्रिया मंदावते, जी सीव्हीआयग्रस्त पायांसाठी अत्यंत लाभदायी असते.
जास्तीत जास्त चाला :
ऑफिस किंवा घर कुठेही असो खूप जास्त वेळ पाय लटकावून बसणे त्रासदायक असते. त्यामुळे पायाखाली स्टूल घ्यावा किंवा दर दोन तासांनी उठून पाय मोकळे करावे. जेवणामध्ये तेल किंवा तुपाचा वापर कमी करावा. खूप मसालेदार भोजन करू नये. या आजाराने ग्रस्त महिलांनी कमी कॅलरीचे तंतुमय घटक असलेले पदार्थ सेवन करावेत. त्याशिवाय वजनही नियंत्रणात ठेवले पाहिजे.
काहीवेळा पायावर काळे डाग येतात, जे चांगले दिसत नाहीत. हे डाग खूप भीतीदायक आणि घाणेरडे दिसतात. अनेकदा ही त्वचेशी निगडीत समस्या समजून दुर्लक्ष करतात; पण असे करणे योग्य नाही.
हेही वाचा