File Photo
Latest
नव्या वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी देवो : देवेंद्र फडणवीस
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नव्या वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी दवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या निमित्ताने आले असता नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. "सर्वांसाठी नवे वर्ष सुखसमाधानाचे जावे," असे ते म्हणाले. ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत, त्या आमच्या देखील आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात, अशीच प्रार्थना असल्याचे ते म्हणाले. नव्या वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी मिळावी, अशीही प्रार्थना असल्याचे फडणवीस आवर्जून म्हणाले.
हेही वाचा :

