Navi Mumbai : नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; पाठलाग करुन पोलिसांवर हल्ला | पुढारी

Navi Mumbai : नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; पाठलाग करुन पोलिसांवर हल्ला

कोपरखैराने: पुढारी वृत्तसेवा: नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. २ ते ३ ट्रक चालकांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला आला आहे. ही घटना आज (दि.१) दुपारी नवी मुंबईतील उरण उलवे येथील जेएनपीटी मार्गावर घडली. Navi Mumbai

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. सकाळच्या सत्रात शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र, दुपारी एक नंतर उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रास्ता रोको केला. त्याला विरोध करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करून काठ्यां घेऊन पोलिसांचा पाठलाग करून हल्ला करण्यात आला.  पोलिसांनी देखील काही वेळातच आंदोलकांवर कारवाई करत लाठीचार्ज केला असून काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. Navi Mumbai

हेही वाचा 

संबंधित बातम्या

Back to top button