

पुणे : आपल्या महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. आपल्याला माहित आहे की, पद्मश्री विखे पाटील, वैकुंठभाई मेहता धनंजय गाडगीळ यांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपल्या देशात सर्वात जास्त सहकार ग्रामपातळीवर कुठे पोहचला असेल तर तो आपल्या महाराष्ट्रत पोहचला आहे. सहकारातून समृद्धी येऊ शकते अशी व्यवस्था राज्याने उभी केल्यामुळे सर्वात मोठे सहकार क्षेत्र राज्यात उभं झालं आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या पिंपरी चिंचवड येथील संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सहकारिता मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवीन कायदा आणून देशात गावपातळीवर सहकार घेऊन जाण्यासाठी व्यवस्था उभी केली आहे. ती डिजीटल पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना सुलभरित्या मिळाली पाहिजे या अनुषंगाने अधुनिक पोर्टल उभं केलं आहे. या पोर्टलचे उद्घाटन दिल्ली किंवा गुजरातलाही करू शकले असते, मात्र, सहकाराची पंढरी महाराष्ट्र आहे म्हणून अमित शाहांनी महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा निवडला आहे असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा