

पुढारी ऑनलाईन :
केंद्रीय गृहामंत्री अमित शहा कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज चिंचवड मध्ये त्यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन होत आहे. यानंतर शहा यांनी जवळपास 4 तासांचा वेळ राखीव ठेवला होता. पण या दौऱ्यात आता बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर शहा हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याचं समोर येत आहे.
पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये दुपारी 12 वाजता केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS)कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर ते काही नेत्यांच्या भेटी घेण्याची वेळही नियोजित होती. पण यात बदल करून तीन वाजता अमित शहा दिल्लीला प्रयाण करतील.
हेही वाचा :