केजरीवालांचा पाय खोलात..! आता ‘मोहल्ला क्लिनिक’ची होणार सीबीआय चौकशी
पुढारी ऑनलाईन डेस्क : मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 'ईडी' चाैकशीच्या भाेवर्यात सापडले असतानाच आता दिल्ली सरकारच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमधील बनावट चाचणी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस दिल्लीचे ( Delhi ) नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना ( LG VK Saxena) यांनी केली आहे.
( LG VK Saxena recommends another CBI enquiry in 'Fake lab tests' in Mohalla clinics.)
दिल्ली नायब राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये बनावट रुग्णांच्या नावाने पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी नायब राज्यपाल कार्यालयाने दिल्ली सरकारी रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये काही जीवरक्षक औषधांसह अ-मानक औषधांच्या खरेदी आणि पुरवठ्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. दिल्लीच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या केंद्रीय खरेदी संस्थेकडून अशा बनावट औषधांचा पुरवठा सरकारी रुग्णालयांना करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात गेला हाेता.
रुग्णांसह नागरिकांच्या मोठ्या प्रमाणातील तक्रारीनंतर इहबास, लोकनायक आणि दीनदयाल उपाध्याय रुग्णालयांमधून नमुने गोळा करण्यात आले. या तिन्ही रुग्णालयात लाखो रुग्ण उपचार घेतात. दरम्यान दिल्ली सरकारवर दारू घोटाळ्याचा आरोप आहे. याचा तपास सुरु आहे. भाजपने दिल्ली सरकारवर जल बोर्डात घोटाळा केल्याचा आरोपही केला आहे.
हेही वाचा :
- Delhi Liquor Policy scam | अरविंद केजरीवालांना आज अटक होणार? AAP नेत्यांनी व्यक्त केली भीती
- BJP on Jitendra Awad | प्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल
- YS Sharmila joins Congress | मोठी बातमी! मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांचा YSRTP पक्ष काँग्रेसमध्ये विलीन

