Tahir Hussain : दिल्ली दंगलीचा आरोपी ताहीर हुसेन याला पाच प्रकरणात जामीन

Tahir Hussain : दिल्ली दंगलीचा आरोपी ताहीर हुसेन याला पाच प्रकरणात जामीन
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : २०२० साली दिल्लीत झालेल्या भीषण दंगल प्रकरणातील आरोपी ताहीर हुसेन याला दिल्ली उच्च न्यायालयाने पाच प्रकरणांमध्ये जामीन दिला आहे. दयालपूर भागात झालेल्या दंगल प्रकरणी त्याला हा जामीन देण्यात आला आहे.

दंगली घडविणे, हत्या, आगी लावणे तसेच गुन्हेगारी कट रचण्यासह एकूण ११ गुन्हे हुसेन याच्याविरोधात दाखल आहेत. दंगलीसाठी हवालाच्या माध्यमातून आलेला पैसा वापरल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पाच प्रकरणांत हुसेनला जामीन दिला जात असल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. या प्रकरणांतील इतर सर्व आरोपींना जामीन देण्यात आलेला आहे. मात्र हुसेन यांना जामीन देण्यात आला नसल्याचा युकि्तवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांकडून करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. हुसेन याच्याविरोधात अन्य प्रकरणे असल्याने जामीन मिळून सुध्दा तो बाहेर येऊ शकणार नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news