

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील केशोपूर मंडीजवळील दिल्ली जल बोर्ड प्लांटमध्ये तब्बल ४० फूट खोल बोअरवेलमध्ये एक मूल पडले. एनडीआरएफचे प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह यांच्यासह एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ज्या बोअरवेलमध्ये मुलगा पडला आहे त्याच्या समांतर एक नवीन बोअरवेल खोदून लवकरच बचाव कार्य सुरू करेल. (Delhi Borewell Accident)
माहितीनुसार, दिल्लीतील केशोपूर मंडीजवळील दिल्ली जल बोर्ड प्लांटमध्ये एक चिमुकला खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच एनडीआरएफचे प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह यांच्यासह एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले आहे. एनडीआरएफ बचाव पथकाचे नेतृत्व प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिंग म्हणाले, "ज्या ठिकाणी मूल पडले होते त्याच्या समांतर बोअरवेल खोदून आम्ही लवकरच बचाव मोहीम राबवू. तथापि, हे दीर्घकाळ चाललेले ऑपरेशन असू शकते."
हेही वाचा