

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्रा जिथे जाते तिथे तिच्या नवीन लुक आणि पेहराव्यामुळे चाहत्यांना आकर्षित करते. प्रियांका चोप्राने नुकतीच अमेरिकेतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिची सब्यसाची साडी खूप चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे तिने पोस्ट केलेल्या फोटोवरील कॅप्शन खूप व्हायरल झाले आहे. तिच्या या फोटोमुळे Priyanka Chopra Night Saree हे शब्द ट्रेंडिंगवर आले आहेत.
प्रियांका चोप्राने अलीकडेच लॉस एंजेलिसमधील बेव्हरली हिल्स येथे एका कार्यक्रमात काळ्या रंगाच्या साडीत चाहत्यांना केले. प्रियंका LA मधील Saks या लक्झरी फॅशन स्टोअरमध्ये सेलिब्रिटी फॅशन डिझायनरच्या पॉप-अपमध्ये सहभागी झाली होती. शनिवारी (दि. ९) सकाळी प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो सध्या ट्रेंडिंगवर आहेत.
बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यंत तिच्या अभिनयाच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर ती तिच्या लुकसाठी देखील नेहमी चर्चेत राहते. प्रियांकाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. "काल रात्री…?," असे कॅप्शन या फोटोवर तिने लिहिले आहे. सुंदर सिक्वीन्स आणि सिल्कची ही साडी आहे. या फोटो चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
प्रियांकाच्या या नव्या साडीची चर्चा आणखी एका वेगळ्या कारणांसाठी आहे. कार्यक्रमातील तिचा साडीतील लुक हा पूर्णपणे वेगळेपण दर्शवतो. तिने तिची साडी काळ्या ब्लाउजसोबत जोडली तसेच दागिने आणि मेकअप कमीत कमी ठेवला आहे.
हेही वाचा