

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर -पठाण अशा दमदार बॉलिवूडपटानंतर बी-टाऊनच्या दोन सुपर हॉट अभिनेत्री एकत्र दिसणार आहे. कॅटरीना कैफ आणि दीपिका पदुकोन या दोन अभिनेत्री यशराजच्या चित्रपटात धमाका करताना दिसणार आहेत. बॉलिवूडमध्ये स्त्री-प्रधान चित्रपट फार कमी झालेले आहेत. आता दोघींचा ॲक्शन अभिनय प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दोघी पहिल्यांदा एकत्र या चित्रपटात दिसणार आहेत. यशराज फिल्म्स एक नवा चित्रपट आणत आहे. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कॅटरीना कैफची मुख्य भूमिका पाहायला मिळेल.