

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये मोठी धावसंख्या उभारली. त्यांनी 20 षटकांत सात गडी गमावून 272 धावा करून दिल्लीसमोर 273 धावांचे मोठे लक्ष्य आहे. आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्याच वेळी, एकूण टी20 मध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. 272 धावा ही कोलकात्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध सहा विकेट्सवर 245 धावा केल्या होत्या. 27 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा तडकावल्या होत्या.
सुनील नरेन आणि फिलिप सॉल्ट यांनी सामन्याची झंझावाती सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.3 षटकांत 60 धावा जोडल्या. नॉर्टजेने ही भागीदारी तोडली. त्याने सॉल्टला (18) बाद केले. यानंतर नरेनने 18 वर्षांचा युवा भारतीय फलंदाज अंगक्रिश रघुवंशीसह चौकार आणि षटकार ठोकले. या दोघांनी 48 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली.
नरेनने आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. त्याला मार्शने बाद केले. त्याचवेळी, रघुवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 27 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर 11 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी तुफानी खेळी खेळली.
रिंकू आठ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. कोलकात्याच्या डावातील 20 वे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा आला आणि त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रसेलला शानदार यॉर्कर टाकून क्लीन बोल्ड केले. या यॉर्करवर रसेलचा तोल गेला आणि तो पडला. त्याने 19 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशांतने रमणदीपला पायचीत केले. त्याला दोन धावा करता आल्या.
व्यंकटेश अय्यर पाच धावांवर तर स्टार्क एका धावेवर नाबाद राहिला. इशांतने 20 व्या षटकात केवळ आठ धावा दिल्या. दिल्लीकडून नॉर्टजेने तीन बळी घेतले. तर, इशांतने दोन विकेट घेतल्या. खलील आणि मार्शला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, सुमित कुमार, खलील अहमद.
इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज.
हेही वाचा :