कॉंग्रेसने जात प्रमाणपत्र सदोष असूनही रश्मी बर्वेंना उमेदवारी का दिली? मनीषा कायंदे यांचा सवाल | पुढारी

कॉंग्रेसने जात प्रमाणपत्र सदोष असूनही रश्मी बर्वेंना उमेदवारी का दिली? मनीषा कायंदे यांचा सवाल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रामटेक येथील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी सदोष जात प्रमाणपत्र असल्याने बाद ठरू शकते हे काँग्रेस पक्षाला माहित असताना देखील त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी का दिली,असा सवाल शिंदे गट-शिवसेना सचिव मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. मविआने याबाबत विरोधकांना लक्ष्य केले असताना शिवसेनेने आता विरोधकांवर पलटवार केला.
उमेदवारी देउन फॉर्म भरायला लावला त्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र सदोष असल्याचं लक्षात आलं. हे होणारच हे काँग्रेस पक्षाला माहित होतं, असा दावा मनीषा कायंदे यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमी महिलांसाठी हे करु ते करु म्हणतात, महिलांसाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करु असे म्हणतात. मात्र स्वतःच्याच पक्षाच्या महिला उमेदवारासोबत असे कृत्य करुन एखादी महिला राजकारणात आल्यावर तिचं खच्चीकरण करायचं ही केवळ काँगेस पक्षाची निती असू शकते, अशी टीका कायंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Back to top button