Cyclone ‘Michaung’ Update : ‘मिचॉन्ग’चा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर, वादळामुळे ८ जणांचा मृत्यू

Cyclone 'Michaung' Update
Cyclone 'Michaung' Update
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिचौंग' चक्रीवादळामुळे, चेन्नई हवामान केंद्राने मंगळवारी (दि.) सकाळी तामिळनाडूच्या दहा जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस, हलके वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चेन्नई, तिरुवल्लूरमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone 'Michaung' Update) अतितीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग मंगळवारी बापतला जवळील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

Cyclone 'Michaung' Update : वादळामुळे 5 जणांचा मृत्यू

तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग देशाच्या दक्षिणेकडील राज्ये, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर केला आहे. चेन्नईत वादळ आणि मुसळधार पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ आल्याने मुसळधार पावसामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर 12 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. तीव्र चक्रीवादळ मंगळवारी सकाळी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काकीनाडा येथे 25 मिमी, मछलीपट्टणम (28 मिमी), नेल्लोर (76 मिमी), ओंगोले (34 मिमी), तिरुपती (64 मिमी), कावली (66 मिमी), नरसापुरम (39 मिमी) पाऊस पडला आहे. बुधवारपर्यंत (दि.६) आंध्र प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तिरुपती विमानतळाचे संचालक केएम बसवराजू यांनी सांगितले की, "खराब हवामानामुळे सोमवारी (दि.४) सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. संततधार पावसामुळे, तिरुमला तिरुपती देवस्थानमने श्री कपिलतीर्थम धबधब्यावर पवित्र स्नान करण्यापासून भाविकांना तात्पुरते थांबवले आहे."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news