Cyclone Michaung Update : चेन्नईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मिचौंग चक्रीवादळाने पूरस्थिती | पुढारी

Cyclone Michaung Update : चेन्नईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मिचौंग चक्रीवादळाने पूरस्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मिचौंग’ चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ आल्याने चेन्नईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. या पावसाचा सर्वाधिक धक्का तिरुअनंतपूरम शहराला बसला आहे.

चेन्नईतील बहुतांश भाग पाण्यात बुडाले आहेत. सखल भागात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई शहर आणि त्यांच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला, आज (दि. ४) पहाटे 5:30 वाजेपर्यंत मीनमबक्कममध्ये 196 मिमी आणि नुंगमबक्कममध्ये 154.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कांचीपुरम शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. तामिळनाडूमधील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) पथकांनी पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम भागातील सुमारे 15 लोकांना वाचवले.

मंगळवारी (दि. ५) ‘मिचौंग’ हे चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी, ताशी 80-90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

Back to top button