Ruturaj Gaikwad : CSK च्या ऋतुराज गायकवाडचे जल्लोषात स्वागत

Ruturaj Gaikwad : सीएसकेचा ऋतुराज गायकवाडचे जल्लोषात स्वागत
Ruturaj Gaikwad : सीएसकेचा ऋतुराज गायकवाडचे जल्लोषात स्वागत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) शुक्रवार दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला. CSK ने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. CSK कडून खेळताना मूळच्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाड याने चमकदार कामगिरी केली. त्याने तडफदार फलंदाजी करत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज इलेव्हन (सीएसके) चा सलामीवीर, ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याचे जुन्या सांगवी येथील घरी आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या खबरदारीमुळे चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी घरी परतण्याची गुप्तता पाळली. वडील दशरथ गायकवाड यांनी पहाटे मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराला ऋतुराजच्या येण्याची वार्ता कळवली. विमानतळावरून रो थेट मधुबन मित्र मंडळाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेवून विश्रांतीसाठी घरी गेला.

ऋतुराज घरी आल्यानंतर आई सविता गायकवाड व सांगवीकर महिला भगिनींनी लाडक्या ऋतुराजचे औक्षण करून स्वागत केले. परिसरातील मित्र परिवाराने येण्याची बातमी कळताच घरी धाव घेतली‌‌. कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला या जयघोषाने ऋतुराजचे जुनी सांगवीत स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news